चंदनाच्या लाकडाची 10,000 रुपये/ किलो इतकी किंमत का आहे ?

      चंदनाचे लाकूड आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये
अतिउच्च भावात विकले जाते.
त्याच्या सौंदर्यवर्धक आणि रोगनिवारक
क्षमतेमुळे त्याला एवढे महत्त्व
प्राप्त झालेले आहे. याच
कारणाने बऱ्याचदा चंदनाच्या झाडाची
झालेली चोरी, त्यासंबंधी गुन्हे
यांबद्दल आपण पुष्कळदा
ऐकत असतो. तर
आजच्या या लेखामधून
चंदनाच्या झाडाची एवढी किंमत
का असते तसेच
त्यासंबंधी नियम व
कायदे यांचा विस्तृत
आढावा आपण घेणार
आहोत.

           चंदनाचे लाकूड हे
जगामधील सर्वात महागडे लाकूड
मानले जाते. त्याच्या
सुगंधी खोडाची किंमत सुमारे
10,000 रुपये प्रति किलो
इतकी
आहे. भारताच्या दक्षिण
भागात म्हणजेच कर्नाटक,
तमिळनाडू आणि आंध्रप्रदेशमध्ये
प्रामुख्याने चंदनाची शेती करण्यात
येते. तसेच आंतरराष्ट्रीय
स्तरावर
चीन, ऑस्ट्रेलिया,
इंडोनेशिया, फिलिपिन्स यांमध्ये प्रामुख्याने
चंदनाचे उत्पादन घेण्यात
येते.
चंदनाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याच्या
वाढीसाठी जास्त पाण्याची गरज
पडत नाही व
त्याचे फळ हे
वर्षभर उपलब्ध असते. भारतामध्ये
2002 सालापर्यंत वैयक्तिकरित्या चंदनाचे उत्पादन घेण्यास
बंदी होती पण
त्यानंतर वैयक्तिकरीत्या मान्यता देण्यात आली
फक्त झाडाची वाढ
झाल्यानंतर त्याची कापणी आणि
विक्री परस्पररित्या केल्यास तो गुन्हा
मानला जातो. त्यामुळे
कापणी आणि विक्री
करण्यासाठी राज्य वन विभागातर्फे
परवानगी देण्यात येते. विभागातील
अधिकारी त्या ठिकाणी
भेट देऊन झाडाची
परिस्थिती समजून घेतात, त्याची
कापणी व विक्री
करतात आणि त्यामधून
आलेल्या उत्पन्नापैकी काही शुल्क
आकारून
  उत्पादन
घेणाऱ्यास उरलेली रक्कम सुपूर्द
केली जाते.

          चंदनाच्या उत्पादनामध्ये जास्त
प्रमाणात असलेल्या नियमांमुळे व
झाडांची चोरी या
सर्व गोष्टींच्या प्रभावाने
त्याचे उत्पादन घेण्यास कमी
कल जाणवतो. या
नियमांच्या प्रभावामुळे भारतातील चंदनाच्या
प्रजाती 90 टक्के कमी झालेल्या
आहेत. मद्रास कॉलेजचे
प्रोफेसर डॉक्टर नरसिम्हण यांच्या
मतानुसार, जर आपण
नियमांमध्ये सुट देवून
मोठ्या प्रमाणात चंदनाचे उत्पादन
करायचे ठरवल्यास बाजारात असलेली
मागणी पूर्ण केली
जाऊ शकते आणि
सर्वत्र उपलब्ध झाल्यावर त्यासंबंधी
चोरीचे गुन्हे कमी होऊ
शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चंदनाला असलेली
मागणी या संधीचा
आपण उपयोग करून
भारताच्या अर्थव्यवस्थेला आर्थिक रित्या प्रोत्साहन
देऊ शकतो. चंदनाच्या
वाढीसाठी काही ठराविक
गोष्टी महत्त्वपूर्ण आहे ज्यामध्ये
चांगल्या प्रमाणात सूर्यप्रकाश, पाण्याचा
निचरा होण्यासाठी जागा,
वरच्या दिशेने वाढीसाठी लागणारी
जागा यांचा विचार
केला जातो. याचे
रोपटे लावल्यानंतर 7 वर्षांनी
त्या झाडावर फुले
व फळे येण्यास
सुरुवात होते आणि
10 वर्षांनी त्याच्या खोडाला सुवासित
असा सुगंध आलेला
असतो
. तसेच झाडाचे
खोड व मुळे
यांच्यापासून चंदनाचे तेल बनवण्यात
येते व खोडामध्ये
आढळणारा टॅनिन  नावाचा
पदार्थ रंग बनवण्यासाठी
वापरला
जातो.

           सामाजिक वृक्षारोपण कार्यक्रमांद्वारे
चंदनाच्या रोपांचे वाटप वनविभागातर्फे
करण्यात येते. कर्नाटक राज्यामध्ये
व्यावसायिक दृष्ट्या चंदनाची लागवड
करण्यास मान्यता देण्यात आलेली
आहे. यामध्ये रोप
लावल्यानंतर ते सरकारची
मालमत्ता समजले जाते तसेच
त्याच्या कापणीवर परवानगी देण्यात
येते आणि विक्रीनंतरची
रक्कम ही काही
शुल्क कापून उत्पादन
घेणाऱ्यास देण्यात येते. या
झाडाला सरकारी मालमत्ता घोषित
करण्यामागचे कारण असे
की, सौंदर्यवर्धक, धार्मिक,
औषधीक, व्यावसायिक, औद्योगिक अशा
विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या
मागणीचा सरकारच्या तिजोरीला फायदा
होत असतो. शेतकऱ्यांना
व्यावसायिक दृष्ट्या मोठ्या प्रमाणात
लागवडीची परवानगी दिल्याने त्यांची
आर्थिक प्रगती होण्यासाठी हा
एक चांगला उपाय
मानला जातो.

        1960 च्या दशकात
भारतामध्ये
सुमारे 4,000 टन चंदनाचे
उत्पादन होते
. त्याच वेळी
आंतरराष्ट्रीय बाजारात 6000 ते 7000 प्रति वर्ष
इतकी प्रचंड मागणी
होती त्यामुळे भारत
त्यावेळी जगामध्ये चंदन उत्पादनात
अग्रेसर देश होता.
उत्तरप्रदेश मधील कन्नोज
या शहराची ” भारताची
परफ्युम राजधानी
” म्हणून ख्याती होती.
येथील चंदनाच्या तेल
व अत्तर यांच्या
सुगंधात एक वेगळीच
मजा होती. येथून
अत्तराची निर्यात सौदी अरेबिया
आणि पश्चिम देशांमध्ये
केली जायची. तसेच
त्यांच्या भरघोस मागणीमुळे दक्षिण
भारतातील चंदन कनौज
या ठिकाणी आणून
त्यापासून तेल आणि
अत्तर बनवण्याचे काम
होत असे. 197879 सालापासून
इंडोनेशिया चंदनाची निर्यात करणारा
सर्वात मोठा देश
बनला
व त्याने
चंदनाचा कच्चामाल निर्यातीवर बंदी
आणली. त्यामुळे चंदनाच्या
तेलापेक्षा त्याच्या कच्च्या मालापासून
जास्त फायदा व्हायला
लागला, याच वेळेचा
फायदा घेऊन चंदनाचे
खोड चोरीकरून विकणे
आणि पैसे कमवने
हा सोपा उपाय
गुन्हेगारांना सापडला तेव्हापासून याचे
उत्पादन भारतामध्ये कमी व्हायला
सुरुवात झाली.

         भारतातील कमी उत्पादनामुळे
आंतरराष्ट्रीय बाजारातील तयार झालेली
पोकळी भरून काढण्यासाठी
ऑस्ट्रेलियाने या संधीचा
फायदा उठवून घेतला.
भारतीय जातीचे चंदनाचे उत्पादन
घेण्यास ऑस्ट्रेलियात सुरुवात करण्यात आली
कारण ऑस्ट्रेलियन जातीपेक्षा
भारतीय जातीचे चंदन याची
गुणवत्ता व मागणीही
जास्त होती. सध्याच्या
आकडेवारीनुसार ऑस्ट्रेलियामध्ये 20 हजार हेक्टर
क्षेत्रामध्ये चंदनाची लागवड करण्यात
आलेली आहे
. त्यापासून
15 ते 17 टन चंदनाचे
तेल प्रति वर्ष
त्यांच्याकडून बनवण्यात येते. असा
अंदाज वर्तवण्यात येतो
आहे की, येणाऱ्या
3 ते 7 वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाकडून भारताला
भारतीय चंदनाच्या जातीपासून बनवलेले
तेल निर्यात करेल.
त्यामुळे या सर्वांचा
विचार करून भारताच्या
भवितव्यासाठी योग्य पावले सरकारने
उचलणे ही काळाची
गरज आहे.

Read More – भारतात हिऱ्यांचा व्यापार कशाप्रकारे केला जातो ?

Read More – हिंदू धर्मातील साधुसंत भगव्या रंगाचे कपडे का परिधान करतात ?

18 thoughts on “चंदनाच्या लाकडाची 10,000 रुपये/ किलो इतकी किंमत का आहे ?”

  1. खुप मस्त माहिती आहे,
    चंदन लागवड करण्यास परवानगी आहे ,पान आत्ता परेंत किती लोकांनी चंदन शेतीचा फायदा घेतला ,तो मुद्धा add कराय पाहिजे होता

    Reply

Leave a Comment