मोबाईल बँकिंग,डिजिटल बँकिंग,इंटरनेट बँकिंग ई ऑनलाइन बँकिंग सुविधा असूनही आजही लोक डिमांड ड्राफ्ट,क्रॉस चेक किंवा बेरर चेक, पासबुक अपडेट इत्यादी सेवांचा आजही लाभ घेत आहेत.
डिमांड ड्राफ्ट व चेक याद्वारे केले जाणारे व्यवहार अत्यंत सुरक्षित व खात्रीदायक असतात, त्यामुळे ग्राहक डिजिटल बँकिंगपेक्षा या पद्धतीने व्यवहार करण्यास पसंती देतात.आजच्या या लेखामधून चेक बाउन्स संबंधित माहिती आपण जाणून घेणार आहोत.चेकद्वारे केल्या जाणाऱ्या व्यवहारांमध्ये चेक बाउंस होणे हे नित्याचेच झाले आहे. तसेच सर्वजण या प्रक्रियेतून गेले आहेत.
▪️ चेक बाउन्स होण्याची कारणे-
1) अपुरा निधी (Insufficient fund).
2) अकाउंट बंद असणे (Account Closed).
3) पेमेंट थांबवा (Stop Payment).
वरील तीन मुख्य कारणामुळे चेक बाउन्स होतात तसेच चेकवर खाडाखोड करणे व सही चुकीची कारणे इत्यादी कारणाने देखील चेक बाउन्स होतात.
भारतीय संविधानात कलम 138 ते 142 मध्ये चेक बाउन्स संबंधित माहिती दिलेली आहे.
▪️ चेक बाउंस झाल्यानंतर केली जाणारी कायदेशीर कारवाई पुढील प्रमाणे-
1) संबंधित व्यक्तीला एका महिन्याच्या आत कायदेशीर नोटीस पाठविण्यात येते. यामध्ये ग्राहक वकीलातर्फे किंवा स्व हस्तलिखित नोटीस पाठवू शकतो.
2) नोटीस पाठविल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित व्यक्तीने त्याचे उत्तर देणे किंवा संपूर्ण रक्कम देणे गरजेचे असते.
3) संबंधित व्यक्तीने 15 दिवसांच्या आत कोणतेही उत्तर दिले नाही तर ग्राहक न्यायालयामध्ये कलम 138 NI निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट (Negotiable Instruments Act) नुसार अपील दाखल करू शकतो.
4) तसेच अपील केल्यानंतर रकमेच्या पंचवीस ते तीस टक्के रक्कम ग्राहकाला अगोदर देणे बंधनकारक असते व उर्वरित रक्कम केस जिंकल्यानंतर देण्यात येते.
5) कलम 138 NI नुसार संबंधित व्यक्तीला दोन वर्षाचा कारावास व रकमेच्या दुप्पट रक्कम देणे बंधनकारक असते.
जर खात्यामध्ये पुरेशी रक्कम शिल्लक नसताना किंवा मुद्दामून चेक जारी केला असेल तर भारतीय दंड न्यायालय ( Indian penal court ) कलम 420 नुसार धोकाधडी ची केस करण्यात येते यामध्ये सात वर्षाचा तुरुंगवास भोगावा लागतो.
चेक बाउन्स संबंधित तक्रार ग्राहक सिव्हिल कोर्टात देखील करू शकतो परंतु यामध्ये निकाल येण्यास चार ते सहा वर्षे लागतात,त्यामुळे चेक बाउन्स संबंधित सर्व तक्रारी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट नुसार करण्यात येतात, ही प्रक्रिया अत्यंत जलद गतीने होते.
देणगी व भेट स्वरूपात मिळालेल्या चेक विरुद्ध कोणतीही तक्रार करता येत नाही.
Read More- Mobile Number हा 10 अंकीच का असतो ?
Read More- भारतीय तिरंगा कोठे बनवला जातो?