पृथ्वीच्या गर्भातून मानवाला पाणी व इंधन मिळते तसेच सर्वात मौल्यवान धातू सोने हे देखील मिळते. ज्या देशाच्या तिजोरीमध्ये सोन्याचा साठा आहे, तो देश श्रीमंत देशांच्या यादीमध्ये गणला जातो. गरीब असो किंवा श्रीमंत प्रत्येकाला सोन्याची आवड आहे. भारतामध्ये सण उत्सवामध्ये सोने परिधान करण्याची प्रथा आहे. त्या अनुषंगाने भारतामध्ये सोन्याची मागणी आहे. आजच्या या लेखामधून भारतात कोणत्या प्रदेशात सोन्याच्या खाणी आहेत याची माहिती जाणून घेणार आहोत.
भारत जगाच्या पटलावर सोने उत्पादनामध्ये साठाव्या क्रमांकावर आहे. जगामध्ये चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया सोने उत्पादनामध्ये प्रमुख देश आहेत. 2006 पर्यंत साऊथ आफ्रिका जगामध्ये सोने उत्पादनांमध्ये अग्रेसर होता तसेच त्याचा जगाच्या पटलावर सोने उत्पादनामध्ये डंका होता. परंतु 2006 नंतर चीन, ऑस्ट्रेलिया, रशिया, सोने उत्पादनांमध्ये आघाडीवर आले.
एकूण जागतिक सोन्याचे उत्पादनामध्ये भारताचे 0.75% येवढे योगदान आहे. चीन, रशिया, कॅनडा, अमेरिका, पेरू, व ऑस्ट्रेलिया हे देश सोने उत्पादनामध्ये भारताच्या भारतापेक्षा अग्रेसर आहेत .भारतात मुख्यता कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये सोन्याच्या खाणी आहेत. तसेच इतर राज्ये मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, व वेस्ट बंगाल या राज्यांमध्ये काही प्रमाणात सोन्याचे उत्पादन केले जाते.
कर्नाटक मध्ये दोन सोन्याच्या खाणी आहेत-
▪️ कोलार गोल्ड फील्ड Kolar Gold Field (KGF)
के.जी.एफ हा सूप्रसिद्ध चित्रपट या सोन्याच्या खाणी वर आधारित आहे.जगातील सर्वात खोल सोन्याची खाण म्हणून ह्या खाणीची ओळख आहे . तीन किलोमीटर पेक्षाही जास्त खोल या खाणी चे खनन झालेले आहे. जिऑलॉजिकल सर्वे च्या अंदाजानुसार या खाणी मध्ये 17000 किलो सोने अजून शिल्लक आहे. परंतु 2001 मध्ये ही सोन्याची खाण बंद करण्यात आली आहे. एवढ्या खोल खाणीमध्ये खनन करणे अवघड असून त्यासाठी प्रचंड गुंतवणुकीची गरज लागते त्यामुळे याचे काम बंद आहे.
▪️ हुत्ती गोल्ड फील्ड Hutti Gold Field
कोलार गोल्ड फील्ड्स नंतर या खाणीचा सोने उत्पादनांमध्ये भारतात प्रथम क्रमांक आहे. तसेच सध्या स्थिती मध्ये या सोन्याच्या खाणी मधून सोन्याचे खनन केले जाते. ही एक चालू स्थितीतील सोन्याची खाण आहे.भारताच्या सोने उत्पादनाच्या बाबतीत कर्नाटक हे राज्य अग्रेसर आहे. कर्नाटक राज्यामध्ये भारतातील एकूण 90% सोन्याचे उत्पादन केले जाते.
आंध्रप्रदेश मधील सोन्याची खाण –
▪️रामगिरी गोल्ड फील्ड Ramgiri Gold Field.
भारतातील दुसऱ्या नंबरची सर्वात मोठी सोन्याची खाण म्हणून या खणीची ओळख आहे.सोन्याचे खनन जमिनीतून केले जाते तसेच आता नदीच्या प्रवाहातून सोन्याचे उत्पादन केले जाते. डोंगर-दऱ्या वरून नदीच्या प्रवाहात सोन्याचे बारीक बारीक कण प्रवाहात वाहून येतात व ते विविध यंत्रांच्या सहाय्याने त्यांना वेगळे केले जाते. भारतात केरळ आणि हिमाचल प्रदेश राज्यांतील नद्यांमधून देखील सोने काढले जाते.
Read More- चंदनाच्या लाकडाची 10,000 रुपये/ किलो इतकी किंमत का आहे ?
Read More- पोस्टाचा पिनकोड ६ अंकीच का असतो?