Union Budget 2022
1 फेब्रुवारी आला की भारतामध्ये देशाच्या अर्थसंकल्पावरील चर्चांना उधाण येते. कोणत्या क्षेत्राला किती अर्थसहाय्य दिले जाईल यावर सर्वांचे बारीक लक्ष असते. हे बजेट लोकसभेसमोर सादर करण्यापूर्वी भारताच्या अर्थमंत्री ‘ लाल रंगाची बॅग ‘ सभागृहाच्या बाहेर सर्वांना दाखवतात. तर ह्या ‘ लाल बॅग ‘ चा इतिहास आपण आजच्या लेखातून जाणून घेवूया.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी लाल रंगाची सुटकेस दाखवणे ही खूप जुनी व पारंपारिक पद्धत आहे. ब्रिटिश काळापासून लाल रंगाची सुटकेस दर्शविण्यात येत आहे. फ्रेंच भाषेतील ‘बोजेट ‘ या शब्दाचे रुपांतर बजेट असे झाले ज्याचा अर्थ चमड्याची बॅग असा आहे. दरवर्षी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी वित्तमंत्री आपल्या हातामध्ये असलेल्या लाल रंगाची सुटकेस सोबत फोटो काढतात. यावरून कल्पना येते की आज देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. तसेच ही परंपरा भारतीय नसून मूळ ब्रिटिशकालीन पद्धत आहे.1733 सली ब्रिटनचे वित्तमंत्री रॉबर्ट वॉलपोल चामड्याच्या बॅगमध्ये देशाच्या आर्थिक स्थितीचा लेखाजोखा सादर करण्यासाठी आले होते. वॉलपोल संसदेत पोहोचल्यानंतर सदस्यांनी त्यांना बॅग उघडण्यास सांगितले तत्पूर्वी त्यांनी सांगितले की ‘बघा ह्या बॅगमध्ये काय आहे, आज जगभरातील शेकडो देशांचा आर्थिक लेखाजोखा यातून समोर येणार आहे.’
Read More- भारतीय तिरंगा कोठे बनवला जातो?
Nice Information,Hidden information
????????????????
ज्ञान साध्या रंजक भाषेत सांगणारा लेख????????