मानव दिवसेंदिवस अधिक वेगाने प्रगती करत आहे आणि या प्रगतीमध्ये त्याच्याकडून झालेला कचरा ही एक मोठी समस्या आहे. पृथ्वीप्रमाणेच कचऱ्याची समस्या आता अवकाशातही जाणवू लागली आहे. आपल्या पृथ्वीभोवती एवढ्या प्रचंड प्रमाणात कचरा आहे की तो कमी करण्यासाठी आपल्याला एक विशेष मोहीम सुरू करावी लागली आहे. तर आजच्या या लेखामधून आपण अंतराळातील कचरा याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
वैज्ञानिकांच्या मतानुसार अंतराळात शेकडो टन कचरा आहे. यामुळे भविष्यात माणसाला काही मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागेल. अंतराळातील बहुतांश कचरा हा पृथ्वीच्या खालच्या कक्षेत म्हणजेच 2000 किलोमीटरच्या आत आहे. अवकाशात कचरा होण्याची प्रमुख कारणे- अभ्यासाच्या दृष्टीने,वैज्ञानिक दृष्टीने, किंवा पृथ्वीच्या बाह्य भागाचा अभ्यास करण्यासाठी मानव अवकाशात विविध उपग्रह सोडतो. काही कालावधीनंतर अवकाशात सोडलेले हे उपग्रह निष्क्रिय होतात किंवा त्यांचा कार्यकाळ संपतो. त्यानंतर त्यांचे रूपांतर कचर्याच्या ढिगार्यात मध्ये होते व तो कचरा बारीक तुकड्यांमध्ये विखुरला जातो व पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरत राहतो. तसेच आपण जे उपग्रह अवकाशात सोडतो त्या उपग्रहांना या कचऱ्यामुळे धोका निर्माण होतो. कचऱ्याचे बारीक कण किंवा तुकडे एका चालू उपग्रहाला धडकले तर त्या उपग्रहाचे तुकडे होतात व तो कचऱ्याच्या स्वरूपात त्याच कक्षेमध्ये फिरत राहतो. असे सातत्याने घडत असल्याने अंतराळातील कचरा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.
युनायटेड स्टेट्स स्पेस सर्वेलंस नेटवर्क (United States space surveillance network) ही संस्था अवकाशातील वीस हजार पेक्षा जास्त तुकड्यांवर लक्ष ठेवून असते. त्यानुसार 34 हजार तुकडे हे 10 CM पेक्षा जास्त जाडीच्या आहेत, 9 लाख तुकडे हे 1-10 CM जाडीचे आहेत, तसेच 128 दशलक्ष तुकडे हे 1 CM पेक्षा कमी जाडीचे आहेत. अंतराळात निर्मित झालेला हा कचरा मानवाच्या प्रगतीमध्ये निश्चित बाधा आणू शकतो. त्यासाठी हा कचरा कसा कमी करता येईल यासाठी विशेष मोहीम राबवणे गरजेचे आहे.
नासा च्या अहवालानुसार दररोज अंतराळातून एक तरी कचऱ्याचा तुकडा हा पृथ्वीवर कोठे ना कोठे तरी कोसळत राहतो. अंतराळातून येणारा कचरा शक्यतो समुद्रामध्ये कोसळतो व काही वेळेस जमिनीवर देखील कोसळतो. 70 टक्क्यांहून जास्त वेळा अंतराळातील कचरा हा समुद्रातच कोसळलेला आहे.अंतराळातील कचरा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण -शक्ती मुळे खाली येतो व वातावरणातील वायूच्या दबावाने त्यास आग लागते तसेच या आगीमध्ये कचऱ्याचे अवशेष जाळून राख होतात. अल्युमिनियम सारखे धातू देखील या आगीत जळून नष्ट होतात. या आगीमध्ये फक्त उष्णता प्रतिरोधक गोष्टीच शिल्लक राहतात आणि त्याच जमिनीवर किंवा समुद्रामध्ये कोसळतात.
Read More – भारतामध्ये गॅस सिलिंडरच्या किंमती का वाढत आहे ?
Read More – चंदनाच्या लाकडाची 10,000 रुपये/ किलो इतकी किंमत का आहे ?
Nice information,????