दक्षिण भारतातील खाद्यसंस्कृतीमध्ये असो किंवा आपल्या सत्यनारायण सारख्या कार्यक्रमांमध्ये केळीच्या पानावर जेवण व प्रसाद वाढण्याची पद्धत, ती पुरातन काळापासून चालत आलेली आहे. केळीचे पान जेवणाच्यावेळी वापरल्यास त्याचा आपला आरोग्यावर कशाप्रकारे फायदा होतो याबद्दल आपण आजच्या लेखातून जाणून घेऊया.
आधीच्या काळापासून केळीच्या पानावर जेवण करणे किंवा महाप्रसाद वाटप करणे हे आरोग्यासाठी चांगले आहे असे मानले जाते. केळीच्या पानामध्ये ‘ पॉलिफिनॉल ‘ नावाचा पदार्थ जो आपल्या ‘ग्रीन टी ‘मध्येही असतो शरीराला फायदेशीर मानला जातो. ज्यावेळेस आपण पानावर खाद्यपदार्थ ठेवतो तेव्हा केळीच्या पानातील पॉलिफिनॉलचा अर्क जेवणाद्वारे आपल्या शरीरात जातो व आपले रोगांपासून संरक्षण करतो.
केळीच्या पानावर मेणासारख्या पदार्थाचा थर असतो जो पानाला वॉटरप्रुफ बनवतो. ज्या वेळेस आपण गरम जेवण पानावर टाकतो तेव्हा मेणाचा थर वितळतो व जेवणाला एक नवीन स्वाद देवून जातो. ह्या पानांचा आकार मोठा असल्याने बरेच खाद्यपदार्थ यामध्ये ठेवले जातात. दक्षिण भारतातील प्रथेनुसार घरातील पाहुण्यांना केळीच्या पानावरील पुढच्या भागात वाढले जाते व घरातील व्यक्तीला पानाच्या खालच्या भागात वाढले जाते. तसेच पानाला साबणाने धुण्याची गरज नसल्यामुळे रसायन विरहित नैसर्गिक ताटामध्ये आपल्यास जेवणाचा आस्वाद घेता येतो.
Read More – ‘चेक बाऊन्स’ झाल्यावर होणार कारावासाची शिक्षा !!!
Read More – कोरोना आणि ऑनलाईन शिक्षण
Very nice…traditional methods are actually scientific..????