अंतराळात उपग्रह पाठवण्यासाठी PSLV व GSLV यांचा कशाप्रकारे उपयोग केला जातो ?

     भारताची
अंतराळात उपग्रह पाठवणारी जगातील
नामांकित संस्था म्हणजे ‘ इस्रो
‘. विक्रम साराभाई, अब्दुल कलाम
व त्यांच्या सर्व
सहकाऱ्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे आज
आपला देश अंतराळ
क्षेत्रात अग्रेसर मानला जातो.
नुकत्याच EOS03 ह्या उपग्रहाचे
GSLV च्या सहाय्याने अंतराळाच्या दिशेने
मार्गक्रमण नियोजित केले होते
तरी तिसऱ्या टप्प्यात
आलेल्या तांत्रिक अडचणीमुळे या
मार्गक्रमणाला ब्रेक लागला. तर
आजच्या ह्या लेखातून
आपण PSLVGSLV यांमध्ये काय
फरक आहे तो
जाणून घेऊया.

        PSLV (ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण
वाहन)   GSLV (भौगोलिक समांतर उपग्रह प्रक्षेपण
वाहन ) यांच्या सहाय्याने उपग्रह
अंतराळात सोडले जातात. इस्रो
या नामांकित भारतीय
संस्थेद्वारे यांना विकसित करण्यात
आलेले आहे. PSLV चा
उपयोगपृथ्वीवरील निरीक्षण
दूरसंवेदन (Remote sensing) यासाठी केला जातो.
आतापर्यंत भारताकडून 53 वेळेस PSLV चा उपयोग
प्रक्षेपण वाहन म्हणून
केला गेलेला आहे.
तसेच 1750 किलो इतक्या
वजनाचे उपग्रह उचलण्याची क्षमता
या वाहनात असते
त्याच उपग्रहास
600900 किमी उंचीपर्यंत नेण्याच्या उद्देशाने
त्याची रचना करण्यात
आलेली असते. रिमोट
सेन्सिंग उपग्रह उत्तर ध्रुव
ते दक्षिण ध्रुव
अशी पृथ्वीभोवती प्रदक्षिणा
घालत असतात
.

       PSLV ची पृथ्वीभोवतीची
प्रदक्षिणा सूर्याच्या सोबत चालणारी
असल्याने उपग्रहावरील कॅमेरा पृथ्वीचे
अचूक फोटो टिपून
पाठवत असतो व
आपल्या देशातील संसाधनांचे संरक्षण
करत असतो. PSLV हे
चार टप्प्याचे प्रक्षेपण
वाहन आहे. पहिल्या
टप्प्यात S139 रॉकेट बुस्टरद्वारे जास्त
क्षमतेचा जोर खालच्या
बाजूने दिला जातो.
दुसऱ्या टप्प्यात ‘विकास इंजिन’च्या सहाय्याने
लिक्विड रॉकेट इंजिन वापरण्यात
येते. त्यानंतर तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात पृथ्वीचे
वातावरण सोडण्यासाठी अतिरिक्त बळ
प्रदान करण्यात येते.

       GSLV चा उपयोग
संदेश देवाणघेवाणीचा उपग्रह  36,000 किमीपर्यंत
घेऊन जाण्यासाठी केला
जातो. यांची प्रदक्षिणा
घालण्याची स्थिती पृथ्वीसमान असल्याने
आपल्याला पृथ्वीवरून तो एकाच
जागी स्थिर असल्याचे
जाणवते. त्यामुळे पृथ्वीवरील Antenna ची
दिशा बदलण्याची गरज
नसते म्हणून संदेश
देवाणघेवाणीसाठी त्यांचा उपयोग केला
जातो. भारताकडे GSLV MKII नावाचे
सर्वात विकसित प्रक्षेपण वाहन
आहे. GSLV द्वारे 2500 ते 5000 किलो
वजनाचे उपग्रह अवकाशात सोडले
जातात. आतापर्यंत भारताकडून GSLV चा
14 वेळेस उपग्रह प्रक्षेपणासाठी वापर
केला गेलेला आहे.
तसेच GSLV हे तीन
टप्प्याचे प्रक्षेपण वाहन आहे
जे टप्प्याटप्प्याने उपग्रहांचे
अवकाशाकडे मार्गक्रमण करण्यास कारणीभूत
ठरतात.धन्यवाद.


Leave a Comment