अंदमान निकोबार बेटे.Andaman And Nicobar Islands.

     अंदमान आणि निकोबार ( Andaman Nicobar Island ) 

   अंदमान आणि निकोबार द्वीपसमुह हा भारताच्या आग्नेय दिशेला असून तो एक केंद्रशासित प्रदेश आहे. अंदमान बेटांवरील पोर्ट ब्लेअर ( Port Blair ) हे शहर अंदमान आणि निकोबार बेटाची राजधानी आहे. असे मानले जाते कि अंदमान हे नाव रामायणातील हनुमान या नावावरून पडले आहे. हनुमान – हन्दुमान – अंदमान, तसेच निकोबार हे नक्कवरम ( नग्न लोकांचा देश ) नावाने ओळखले जाते. अंदमान आणि निकोबार चे एकूण क्षेत्रफळ 8,293 चौ किलोमीटर आहे. अंदमान आणि निकोबार मध्ये एकूण 572 बेटे आहेत,त्यापैकी 37 बेटांवर तो राहू शकतो व जाऊ शकतो. 2011 च्या जनगणनेनुसार अंदमान आणि निकोबार ची लोकसंख्या  378900 एवढी आहे. या बेटांवर बंगाली,तमिळ,तेलगू,हिंदू,ख्रिश्चन, मुस्लीम ई. प्रमुख भाषा आहे. 44 बेटांवरील बराचसा भाग निसर्गाने व्यापलेला आहे.

Andaman Nicobar Information Marathi

     इतिहास– इ. स 1014 ते ई. स 1042 पर्यंत राजेंद्र चोल तामिळनाडूच्या प्रसिद्ध चोल घराण्यातील एक पराक्रमी राजा होऊन गेला. 1 जानेवारी 1756 मध्ये डॅनिश वसाहती स्थापन झाल्या त्यांना न्यू डेन्मार्क या नावानेही ओळखले जाते. 1858 मध्ये ब्रिटिशांनी तेथे वसाहती उभारल्या. ब्रिटिशांनी तेथे सेल्युलर जेल ( Cellular Jail ) उभारले होते, जो कोणी ब्रिटिश कंपनीच्या विरोधात बोलेल त्यांना सेल्युलर जेल मध्ये पाठवत, कैद्यांना जेव्हा या ठिकाणी पाठवत असे तेव्हा त्याला काळ्या पाण्याची शिक्षा झाली असे समजत. वीर सावरकरांना ही या ठिकाणी जेलमध्ये ठेवण्यात आले होते. नेताजी सुभाष चंद्र बोस यांनी 1943 मध्ये सर्वात पहिल्यांदा स्वतंत्र भारताचा ध्वज उभारला होता तसेच इंडियन नॅशनल आर्मीची ( Indian National Army ) उभारणी हीदेखील या प्रदेशात केली होती. 1950 मध्ये अंदमान आणि निकोबार हे भारताचा एक हिस्सा झाले तसेच 1 नोव्हेंबर 1956 रोजी हा प्रदेश भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आला.

           बॅरन अँड नर्काँडान बेट (barren and Narcondan island ) हा प्रदेश चालू ज्वालामुखी ( Active Volcano ) चा प्रदेश म्हणून ओळखला जातो. ग्रेट निकोबार ( Great Nicobar )हे सुमत्रापासून 147 किलोमीटर लांब आहे.  तसेच या बेटांवर टुरिझम फेस्टिवल ( Island Tourism Festival ), काली पूजा, व दुर्गा पूजा ई. उत्सव साजरे केले जातात. या बेटांवर आदिवासी लोक राहतात तसेच या बेटांवर राखीव संरक्षण आहे. आंतरराष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने या प्रदेशात आपले तिन्ही सैन्यदल तैनात करण्यात आले आहे. याचे मुख्य कार्यालय पोर्ट ब्लेअर येथे आहे. शेतीच्या दृष्टीने या प्रदेशात भात,ऊस, केळी, रताळे, नारळ, सुपारी, आंबा, चिकू,संत्री ई प्रमुख पिके आहेत,तसेच अंदमान मध्ये प्रामुख्याने भाताचे पीक घेतले जाते.

     महात्मा गांधी मरीन नॅशनल पार्क,माउंट हॅरिएट नॅशनल पार्क,राणी झांसी मरीन नॅशनल पार्क, ई राष्ट्रीय उद्यान व वन्यजीव अभयारण्य आहेत.पर्यटनाच्या दृष्टीने या प्रदेशात सेल्युलर जेल,चिडिया तपू,forest museum ई प्रमुख महत्वाची ठिकाणे आहेत

Read More – भारतीय तिरंगा कोठे बनवला जातो?

Read More – Mobile Number हा 10 अंकीच का असतो ?

6 thoughts on “अंदमान निकोबार बेटे.Andaman And Nicobar Islands.”

Leave a Comment