आता पाण्यात होणार ‘अंतविधी’ ? काय आहे नवी पद्धत.

       अलीकडच्या काळात पर्यावरणाशी अनुकूल असणाऱ्या वस्तू, विविध प्रक्रिया यांची जगभरात अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. याच मुद्द्यावर आधारित नैसर्गिकरित्या अनुकूल मानव देहाच्या अंतविधीची प्रक्रिया प्रकाशझोतात येऊ लागली आहे. आजच्या या लेखातून आपण पण या प्रक्रियेविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आता पाण्यात होणार   'अंतविधी' ?  काय आहे नवी पद्धत.

       या पद्धतीला इंग्रजीमध्ये ‘ ऍक्वामेशन (Aquamation) ‘ असे नाव देण्यात आले आहे. ही प्रक्रिया पाण्याच्या सानिध्यात पार पडत असल्याकारणाने त्याला ‘ ज्वालारहित अंत्यविधी ‘ असेही म्हटले जाऊ शकते. ही पद्धत प्रकाशझोतात येण्याचे कारण म्हणजे दक्षिण आफ्रिकेतील नोबेल पुरस्कार विजेते देस्मोंड तुतू यांना निसर्गाबद्दल आपुलकीची भावना असल्याने त्यांनी इच्छा व्यक्त केली की, त्यांच्या निधनानंतर त्यांचा ‘ ऍक्वामेशन ‘ पद्धतीनुसार अंत्यविधी करावा व त्यांचे नुकतेच जानेवारी महिन्यात निधन झाले.

        या पद्धतीमध्ये मानवी शरीराला स्टेनलेस स्टीलच्या मोठ्या भांड्यात ठेवले जाते. त्यामध्ये पाणी व पोटॅशियम हायड्रॉक्साइड रसायनाचे मिश्रण टाकण्यात येते. या मिश्रणामध्ये 95 टक्के पाणी तर 5 टक्के पोटॅशियम हायड्रॉक्साइड हे रसायन टाकण्यात येते. त्यानंतर या सर्वांना 150 डिग्री सेल्सिअस तापमानात 3 ते 4 तास ठेवण्यात येते. त्याचबरोबर शरीरातील हाडे व दाताचा भाग वगळता पूर्ण शरीराचे द्रव स्वरूपात रूपांतर होते व उरलेल्या हाडांना जास्त तापमानाच्या साहाय्याने पांढऱ्या राखेमध्ये परिवर्तित करून परिवाराकडे सुपूर्द करण्यात येते.  

      या पद्धतीचा इतिहास असा की, 1880 च्या दशकात हान्सन नावाच्या एका शेतकऱ्याने मृत जनावरांपासून खत बनवण्यासाठी ही पद्धत विकसित केली होती. त्यावेळेसच्या परिस्थितीमध्ये मृत जनावरे जाळण्यापेक्षा त्यांची या पद्धतीने विल्हेवाट लावणे जास्त सोयीस्कर होते व कालांतराने ही पद्धत बाकीच्या भागांमध्ये मृत व्यक्तींना अंत्यविधी देण्यासाठीही उपयोगात आणण्यात आली. अमेरिकेतील अलबेनी मेडिकल कॉलेजने 1993 साली सर्वात पहिले ‘ ऍक्वामेशन ‘ पद्धत व्यापारी दृष्टीने उभारली. 2003 साली अमेरिकन सरकारने या पद्धतीला कायद्याने मान्यता दिली. 

        या पद्धतीचा निसर्गावर होणारा सकारात्मक परिणाम म्हणजे कमी पाण्याची आवश्यकता, कमी प्रदूषण, कमी जागेत विधी पार पडणे. तसेच यामुळे 90 टक्के उर्जेची बचत होते आणि हरित वायूंचे प्रमाण 35 टक्के कमी होते.

Read more- व्हेल माश्याच्या उल्टीची किंमत तब्बल 1 कोटी रुपये ? Whale vomit Price.

Read More- पोस्टाचा पिनकोड ६ अंकीच का असतो?

1 thought on “आता पाण्यात होणार ‘अंतविधी’ ? काय आहे नवी पद्धत.”

Leave a Comment