ऑलिम्पिक स्पर्धा कशाप्रकारे आयोजित केल्या जातात ?

       ऑलिम्पिक स्पर्धा ही जगातील सर्वात अव्वल स्थानी असलेली स्पर्धा आहे. ही स्पर्धा दर 4 वर्षांनी आयोजित केली जाते. ऑलिम्पिक खेळांची सुरुवात 1896 मध्ये झाली, ग्रीस ची राजधानी अथेन्स मध्ये सर्वात प्रथम ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.1894 मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती स्थापना करण्यात आली. सर्व स्पर्धेचे आयोजन ही समिती करते तसेच तिचे मुख्यालय लोसाने (Switzerland) येथे आहे. ह्या समिती मध्ये एकूण 11 सदस्य असतात त्यातील एक अध्यक्ष, तीन उपाध्यक्ष आणि 7 सदस्य असतात. ऑलिम्पिक स्पर्धा केव्हा व कोठे आयोजित करायच्या हे सर्व ही समिती ठरवत असते. ऑलिम्पिक स्पर्धेचे चिन्ह हे 1920 मध्ये वेरॉन पियारे डी कोबर्टिन यांनी तयार केले होता. या चिन्हांमध्ये दर्शविलेल्या रिंग 5 खंडांचे प्रतिनिधित्व करतात-

         ○ निळी रिंग – युरोप महाखंड

         ○ काळी रिंग – आफ्रिका खंड

          लाल रिंग – अमेरिका माहाखंड

          पिवळी रिंग – आशिया खंड

          हिरवी रिंग – ऑस्ट्रेलिया

हवामानातील ऋतूनुसार प्रामुख्याने दोन मुख्य प्रकारच्या ऑलिम्पिक स्पर्धा असतात – 

1. Summer (ग्रीष्मकालीन) ऑलिम्पिक

2. Winter (हिवाळी) ऑलिम्पिक

        Summer ऑलिम्पिक – या स्पर्धेच्या सुरूवातीच्या वर्षांमध्ये फक्त summer ऑलिम्पिकच होते पण 1924 सालापासून winter ऑलिम्पिक यामध्ये सुरू करण्यात आले. जास्त देशांमधील खेळाडू भाग घेत असल्याने summer ऑलिम्पिक ही जास्त प्रसिद्ध स्पर्धा आहे. यामध्ये सायकलिंग,ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, बास्केटबॉल अशा अनेक खेळांचे आयोजन करण्यात येते. 28 क्रीडाक्षेत्रातील 300 स्पर्धांचे आयोजन यामध्ये करण्यात येते.

         Winter ऑलिम्पिक– ह्या हंगामात बर्फ आणि त्याच्याशी निगडित खेळांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये स्केटिंग, आइस हॉकी, स्नोबोर्डिंग, फिगर स्केटिंग, बॉब्स्लेग आणि स्की जंपिंग यांसारख्या खेळांचे आयोजन केलेले असते. तुलनेने या प्रकारात कमी खेळ असल्याने Summer ऑलिम्पिकपेक्षा कमी प्रसिध्दी मिळते. यामध्ये 15 क्रिडाक्षेत्रातील 102 क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या जातात.

          Summer आणि Winter ऑलिम्पिक या एकाचवेळी आयोजित न करता 2 वर्षांच्या अंतराने आयोजित केल्या जातात. उदा. Tokyo ऑलिम्पिक ही Summer ऑलिम्पिक 2020 आहे तर पुढील दोन वर्षांनी Winter ऑलिम्पिक 2022 मध्ये बीजिंग(चीन) येथे आयोजित केली जाईल. त्यापुढील दोन वर्षांनी 2024 मध्ये पॅरिस (फ्रान्स) मध्ये Summer ऑलिम्पिक आयोजित केले जाईल, अशाप्रकारे नियमानुसार स्पर्धा आयोजित केल्या जातात.

        Paralympic (पॅरालिम्पिक) स्पर्धा ही शारीरिक दृष्टया अपंग व्यक्तिंसाठी दर चार वर्षांनी आयोजित करण्यात येते. जसे 8 ऑगस्ट 2021ला Summer ऑलिम्पिक संपल्यानंतर काही आठवड्यांनी त्याच ठिकाणी 24 ऑगस्ट पासून Summer पॅरालिम्पिक आयोजित करण्यात आलेले आहे. अशाप्रकारे Winter ऑलिम्पिक 2022 नंतर Winter पॅरालिम्पिक 2022 चीन मध्ये आयोजित करण्यात येईल.

          Special ऑलिम्पिक स्पर्धा ही बौद्धिक दृष्ट्या अपंग व्यक्तींसाठी आयोजित केली जाते. या स्पर्धेचे आयोजन देखील बाकी स्पर्धांप्रमाणे केले जाते. ह्या वेळेसच्या ऑलिम्पिकमध्ये भारताकडून आतापर्यंतचे सर्वात जास्त खेळाडू पाठवण्यात आलेले आहे आणि ते जास्तीत जास्त पदके जिंकून येतील असा आपण विश्वास व्यक्त करूया.

                   #Cheers4India

                                                            -ऋषिकेश उगले 
                                                            -सौरभ बिनवडे


Leave a Comment