कॉफी आणि आरोग्य : भविष्यातील संधी

       आजकालच्या जगात कित्येक व्यक्तींचे कॉफीसंबंधी वाढलेले प्रेम ही वेगळे सांगण्याची गरज नाही. कॉफी ही कच्या तेलानंतर जगातील सर्वात जास्त आयात – निर्यात केली जाणारी उपयुक्त वस्तू आहे. बहुतांश देशांमध्ये याची मागणी दिवसेंदिवस वाढत चालल्याचे निदर्शनास येत आहे. आजच्या या लेखातून कॉफी व्यवसाय व त्याची भविष्यातील वाटचाल आपण जाणून घेवूया. 

कॉफी आणि आरोग्य : भविष्यातील  संधी

         आपला भारत कॉफी व्यवसायात जगातील पहिल्या 10 देशांमध्ये येतो. 2025 पर्यंत ही बाजारपेठ 4 लाख करोड रुपयांची उलाढाल करेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.एका सर्वेनुसार 66% तरुण वर्ग कॉफीला प्राधान्य देत असल्याचे समोर आले आहे. भारत जगातील 6 वा सर्वात जास्त कॉफी उत्पादन करणारा देश आहे. अलीकडे कॉफीच्या पानांपासून पेय तयार करण्याची नवीन पद्धत उदयास येत आहे. ज्यामध्ये कॉफीच्या पानांचे अर्क काढून एक नवीन पेय तयार केले जाऊ शकते. ही बातमी कॉफी उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरू शकते कारण बाराही महिने पाने उपलब्ध असल्याने त्यांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. याआधी कॉफी बीन्स विकल्या गेल्यावर 70 टक्के कॉफी मजदुरांना नऊ महिने बेरोजगार रहावे लागत असे पण या नव्या पेयाचा स्वीकार ग्राहकांनी केल्यास वर्षभर रोजगार उपलब्ध होऊ शकेल.

        ह्या नवीन पेयाची चव कॉफी सारखी नक्कीच नसेल पण इंडोनेशिया व इथिओपिया देशांच्या म्हणण्यानुसार या पहिले कॉफीच्या पानांना खत म्हणून वापरले जायचे पण नुकत्याच एका संशोधनानुसार, फिनोलिक एसिड सारखे गुणकारी घटक यात सापडले आहेत ज्यांचा आपल्या शरीरास नक्कीच फायदा होईल. कॉफीच्या पानामध्ये ग्रीन – टी पेक्षा 17% जास्त प्रमाणात अँटीऑक्सीदंट सापडले आहेत. तसेच यातील कलोरोजेनिक एसिड, मंगिफेरीन यांसारख्या पदार्थांद्वारे रक्तदाब, ग्लुकोज स्तर, सूज कमी होण्यास शरीराला मदत होते. 

        आपल्या भारतात 2 मुख्य प्रकारची कॉफी लागवड केली जाते – अरेबिका व रोबस्टा ज्यामध्ये 72 टक्के रोबस्टाचे उत्पादन घेतले जाते. भारतातील 20 लाख लोकांना रोजगार देण्यास हा व्यवसाय कारणीभूत ठरतो. रशिया, इटली, जर्मनी, बेल्जियम यांसारख्या देशांकडून भारतातील कॉफिला चांगली मागणी असते. देशातील 70% उत्पादन हे निर्यात केले जाते. आपल्या दक्षिण भागातील राज्य केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश यामध्ये प्रामुख्याने कॉफीचे पीक घेतले जाते. या पिकाला 20-30 डिग्री तापमान व 150-200 सेमी वार्षिक पाऊस असे एकूण वातावरण सुट होते त्यामुळेच ह्या राज्यांमध्ये कॉफी पीक उत्पादन घेतले जाते. तसेच कॉफीसाठी पाण्याचा निचरा होणारी माती फायदेशीर मानली जाते त्यामुळे उतारावर किंवा डोंगराच्या पायथ्याशी देखील याची लागवड फायदेशीर ठरते.

Read More – Petrol Diesel GST – सुटेल का महागाईचा तिढा ?

Read More – भारतात हिऱ्यांचा व्यापार कशाप्रकारे केला जातो ?

Leave a Comment