क्रिसमस ट्री चा रोमांचक इतिहास ?Christmas tree history

    क्रिसमस ट्री चा रोमांचक इतिहास ?| Christmas tree history   

        नाताळ सण ख्रिस्ती धर्मातील प्रमुख सण मानला जातो. नाताळ सणामध्ये वापरले जाणारे वृक्ष म्हणजेच ख्रीसमस ट्री (Christmas Tree) त्यालाच मराठीमध्ये फर वृक्ष,पाईन वृक्ष,किंवा सदाहरित वृक्ष असे संबोधले जाते. प्रामुख्याने या वृक्षांना नाताळ सणांमध्ये सजविले जाते. 25 डिसेंबर हा प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस आहे त्याच दिवशी नाताळ हा सण साजरा केला जातो.

क्रिसमस ट्री चा रोमांचक इतिहास ?Christmas tree history

        नाताळ सणामध्ये नाताळ वृक्ष वापरण्याची सुरुवात हजारो वर्षांपूर्वी उत्तर युरोप मध्ये झाली होती. तसेच त्याबद्दल जास्त माहिती उपलब्ध नाही. पूर्वी रोमन घराण्यांमध्ये हे वृक्ष घर सजविण्यासाठी वापरत होते. नाताळ वृक्षाचा संबंध हा हिवाळ्यातील संक्रमणाशी आहे. हिवाळ्यामध्ये हे वृक्ष घरामध्ये लावणे पवित्र मानले जाते तसेच त्याला सजविले जाते. असे मानले जाते की नाताळ वृक्षाला सजविल्याने त्याकडे पुण्यात्मा आकर्षित होतात व सकारात्मक ऊर्जा म्हणून देखील या वृक्षाकडे पाहिले जाते.

नाताळ वृक्षाचा इतिहास.

▪️ रोमन व इजिप्त घरांमध्ये सदाहरित नाताळ वृक्ष ठेवणे हे शुभ व पवित्र मानले जाते.

▪️ रोमन साम्राज्यात सदाहरित नाताळ वृक्ष घर सजविण्यासाठी वापरले जात असे त्याचा संबंध हिवाळ्यातील थंडीशी असत.

▪️ नाताळ वृक्ष सजविण्याची परंपरा 1500 मध्ये सुरू झाली

▪️ सोळाव्या शतकात मार्टिन ल्युथर यांनी सर्वप्रथम नाताळ वृक्ष घरी आणून सजविण्यात सुरुवात केली तसेच त्या वृक्षाला लहान लहान मेणबत्त्या यांनी सजविले गेले. त्यानंतर मार्टिन ल्युथर यांनी हे वृक्ष येशू ख्रिस्ताच्या सन्मानार्थ सदाहरित नाताळ वृक्ष प्रकाशित केले.

▪️ तसेच नाताळ वृक्ष जीवन, पुनःजन्म, सहनशक्ती यांचे प्रतीक मानले जाते.

▪️ 1800 मध्ये अमेरिकेत प्रथम नाताळ वृक्षाची विक्री सुरू झाली.

 नाताळ वृक्षाचे नैसर्गिक महत्व.

▪️ नाताळ वृक्ष 30 ते 40 फूट उंचीपर्यंत वाढू शकते.

▪️ या वृक्षाला मुबलक सूर्यप्रकाश आवश्यक असतो.

▪️ नाताळ वृक्ष 150 वर्षापेक्षा जास्त काळ जिवंत राहू शकतो.

▪️ पर्वतीय भागांमध्ये हे वृक्ष प्रामुख्याने आढळतात तसेच त्यांना आम्ल मातीची गरज असते.

▪️ नाताळ वृक्षाची पाने निमुळती असतात.

Read More- मान्सून – “भारताचा खरा अर्थमंत्री”

Read More- Ballistic आणि Cruise Missile चा युद्धात कशाप्रकारे वापर केला जातो ?

1 thought on “क्रिसमस ट्री चा रोमांचक इतिहास ?Christmas tree history”

Leave a Comment