खरंच बदाम खाल्याने बुद्धी वाढते का ?

        थोडे बदाम खात जा, डोक्यात प्रकाश पडेल ! असे बरेचशे सल्ले आपल्याला ऐकायला मिळतात. सकाळी उठून भिजलेले बदाम खाण्यापासून ते डोक्याला लावण्यासाठी असे विविध प्रयोग घराघरात चालू असतात. तर हे बदाम खरंच बुद्धिवर्धक आहेत का ? याबद्दल आपण आज माहिती जाणून घेवूया. 

खरंच बदाम खाल्याने बुद्धी वाढते का ?

 

      बदाम हा मूळचा पश्चिम व मध्य आशिया क्षेत्रातील होय. यामध्ये आढळणारे प्रथिने हे नुसते ऊर्जेचे स्त्रोत नसून ते मेंदूतील खराब झालेल्या कोशिकांना सुधारण्यास मदत करतात ज्यामुळे आपली आकलन करण्याची क्षमता सुधारते. तसेच यामध्ये झिंक या खनिजाचे प्रमाण मुबलक प्रमाणात असल्याने आपल्या रोगप्रतिकारकशक्तीला बळकटी देण्याचे काम चोखपणे पार पाडले जाते. झिंक हा एक उत्तम अँटीऑक्सीडंट म्हणूनही ओळखला जातो ज्यामुळे आपल्या शरीरातील अवयवांचे वय लवकर कमी होत नाही म्हणजेच आपल्यात वृद्ध होण्याची प्रक्रिया लांबविली जाते व त्यात व्हिटॅमिन बी6 , व्हिटॅमिन ई यांचाही मोलाचा सहभाग लागतो.

    बदामात ओमेगा -3 व ओमेगा -6 यांसारख्या फॅटी ऍसिडचाही समावेश असतो ज्यामुळे आपली बौद्धिक क्षमता वाढते व त्यामध्ये असलेल्या मॅग्नेशियमच्या प्रमाणामुळे मज्जासंस्था मजबूत राहते. जगामध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहर बदाम उत्पादनात सर्वात अग्रेसर आहे. तसेच जर्मनी हा देश बदाम आयात करण्यात जगात अग्रेसर आहे. बदाम खाणे हृदयाच्या आरोग्यासाठी खूप गुणकारी मानले जाते ज्यामुळे सूज कमी होते, रक्त वहण करणाऱ्या धमनी मोकळ्या होतात, रक्त गोठण्याचा संभाव्य धोका कमी होवून मेंदूला सुरळीत पुरवठा होतो. 

      रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेले बदाम सकाळी खाल्याने शरीरास खूप फायदा होतो. बदामवरील साल टॅनिनची असल्याने ते पचण्यास वेळ लागतो पण पाण्यात भिजवल्याने हे वरील आवरण काढले जाते. तसेच यामध्ये फ्लावोनाईड आढळतात जे शरीरातील गाठींच्या वाढीस प्रतिकार करतात. बऱ्याचशा संशोधकांच्यामते डायबेटिस, कॅन्सर या रोगांच्या विरुद्ध प्रभावी लढा देण्यास बदाम उपयोगी ठरतात. कॅल्शियम हे मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने हाडे, दात ,नखे मजबूत होण्यास मदत होते. आजकाल केसगळतीच्या प्रश्नांना हे उत्तम उपाय राहू शकते कारण केसांचे मुळे मजबूत करण्याचे काम मॅग्नेशियम व इतर पोषकांमुळे पूर्ण होते. 2021-22 मधील आकडेवारीनुसार, भारतामधील 91 टक्के बदाम उत्पादन काश्मीर, 8.7% हिमाचल प्रदेश व 0.09% महाराष्ट्रात घेतले जाते.

Read More – भारताचे पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपण, प्रारंभ

Read More – ‘चेक बाऊन्स’ झाल्यावर कारावासाची शिक्षा !!!

Leave a Comment