खवले मांजराची अवैध तस्करी तब्बल – 2 लाख प्रति किलो ? Pangolin Animal

      Pangolin Animal Full Information

       भारतातील बहुतांश राज्यांच्या वनविभागाद्वारे खवले मांजर यांची तस्करी करणाऱ्या टोळ्या पकडण्यात आल्या अशा बातम्या आपण समाजमाध्यमातून घेत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 2 लाख रुपये प्रति किलो इतकी या प्राण्याची किंमत का आहे याबद्दल आजच्या या लेखातून माहिती जाणून घेऊया.

खवले मांजराची अवैध तस्करी तब्बल - 2 लाख प्रति किलो ? Pangolin Animal

        खवले मांजर हा प्राणी भारतामध्ये हिमालय, पूर्वोत्तर राज्य आणि वाळवंट वगळता सर्वत्र जंगली भाग किंवा गवत असलेल्या प्रदेशात आढळतो. रात्रीच्या वेळी हा प्राणी बाहेर पडतो आणि मुंग्या, वाळवी अशा छोट्या कीटकांना अन्न म्हणून खातो. त्याला दात नसल्यामुळे खोल बोगद्यांमध्ये, कपारीत, फटीमध्ये लपून बसलेल्या कीटकांना खाण्यासाठी नैसर्गिकरित्या या प्राण्याची जीभ स्वतःच्या शरीरापेक्षाही लांब असते. जगामधील सर्वात जास्त तस्करी करण्यात येणाऱ्या प्राण्यांमध्ये खवले मांजर आढळते. आशिया व आफ्रिका या दोन खंडांमध्ये आठ प्रजाती आढळतात तसेच अमेरिका, चीन, व्हिएतनाम, म्यानमार या देशांमध्ये यांची जास्त मागणी असते. 

        या प्राण्याच्या अंगावर असलेले खवले यांचा उपयोग शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी होतो. ज्यावेळेस त्याला अंदाज लागतो की, आपल्यावर हल्ला होऊ शकतो त्यावेळेस स्वतःभोवती गोल वेढा घेऊन तो संरक्षणासाठी खवले बाहेरच्या दिशेने दाखवतो. चीन व व्हिएतनाम या देशांमध्ये या प्राण्याच्या मांसाचा, खवल्यांचा वापर आयुर्वेदिक तसेच अस्थमाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी केला जातो. 2016 साली 180 राष्ट्रीय सरकारांनी हया प्राण्याच्या कायदेशीर विक्रीसाठी बंदी घालण्याचा ठराव संमत केला. भारतीय खवले मांजर याच्या शरीरावर 11 ते 13 खवल्यांचे पट्टे असतात तसेच यांमधील नर मादीपेक्षा एक तृतीयांश आकाराने मोठा असतो. 

           भारतासह पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या देशांमध्ये भारतीय खवले मांजराचे वास्तव्य असते. ओडिसा आणि मध्यप्रदेश या राज्यांतील वनाधिकार्‍यांनी रेडिओचे टॅग या प्राण्यांना लावून त्यांचे संरक्षण करण्यासाठी मोहीम हाती घेतलेली आहे. रेडिओ टॅगच्या माध्यमातून त्यांचे वास्तव्य, हालचाली यांच्यावर पाळत ठेवून त्यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न स्थानिक पातळीवर चालू आहेत. उडीसामधील नंदनकानन प्राणी उद्यानात हया प्राण्यांची निसर्गामध्ये संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. निसर्गासाठी हया प्राण्याची संख्या खूप महत्त्वाची मानले जाते कारण झाडांना वाळवी पासून वाचवणे, मातीची गुणवत्ता चांगली करणे या सर्व गोष्टींसाठी निसर्गाचे खवले मांजर एक प्रकारे वरदान आहे. 

         शिकार होणे, माणूस आणि प्राणी यांमधील संघर्ष या कारणांमुळे यांची कमी होणारी संख्या ही जागतिक पातळीवर समस्या बनलेली आहे. या प्राण्याचे सूप चीनमधील श्रीमंत लोक दुर्मिळ आजारांना बरे करण्यासाठी पितात. मागच्या काही वर्षांपासून आफ्रिकेतील नायजेरिया हा देश बाकी देशांना अवैधपणे विक्री करण्यासाठी प्रकाशझोतात आलेला आहे. 

         भारतातील काही भागात आदिवासी लोकांना सोबत घेऊन याची अवैध विक्री सुरू असते ज्यामध्ये आदिवासी लोक जंगलामध्ये जाऊन बिळांचा शोध घेऊन त्यामध्ये धूर सोडतात व ते बाहेर आल्यावर त्यांना कडक गरम पाण्यामध्ये उकळवले जाते यामुळे त्याच्या अंगावरील खवले बाजूला होतात आणि त्याचे मटन गरजेनुसार विक्री करण्यात येते. वन्यजीव संरक्षण कायदा 1972 च्या अंतर्गत या प्राण्याला भारत सरकारने संरक्षण प्रदान केलेले आहे आणि याची खरेदी-विक्री केल्यास गंभीर शिक्षेचे प्रावधानही करण्यात आलेले आहे. दरवर्षी फेब्रुवारी महिन्यातील तिसरा शनिवार जागतिक पेंगोलिन दिवस म्हणून साजरा केला जातो.

Read More- कोरोना आणि ऑनलाईन शिक्षण

Read More- पोस्टाचा पिनकोड ६ अंकीच का असतो?

4 thoughts on “खवले मांजराची अवैध तस्करी तब्बल – 2 लाख प्रति किलो ? Pangolin Animal”

Leave a Comment