चंदीगड केंद्रशासित प्रदेश
उत्तर–पश्चिम भारतात
हिमालयाच्या शिवालिक पर्वत रांगेच्या
पायथ्याला आहे . त्याचे एकूण
क्षेत्रफळ 114 sq km आहे. हा
प्रदेश हरियाणा व पंजाब
राज्यांच्या सीमेलगत आहे.भारताचे
पहिले पंतप्रधान पंडित
जवाहरलाल नेहरू यांचे स्वप्नातील
शहर हे चंदिगड
होते (Dream City of India), तसेच हा
प्रदेश रचण्याची योजना प्रसिद्ध
फ्रेंच आर्किटेक्ट कोर्बुझियर यांनी
आखली होती. नयनरम्य
शिवालिक पर्वत पायथ्याशी वसलेले
हे भारतातील विसाव्या
शतकातील शहरी नियोजन
आणि आधुनिक वास्तुकलेतील
सर्वोत्तम प्रयोंगापौकी एक म्हणून
ओळखले जाते. चंदीगड
हे नाव ” चंडी
मंदिर ” च्या मंदिरातून
चंदीगड हे नाव
पडले. देवता ‘चँडी‘
शक्ती ची देवी
आणि मंदिराच्या परिसरात
असलेल्या गड किल्यांमुळे
या शहराला “चंदीगड
– द सिटी ब्युटीफूल
” असे नाव देण्यात
आले. 2011 च्या जनगणनेनुसार
तेथील एकूण लोकसंख्या
1,05,545 आहे तसेच तेथील
साक्षरता दर हा
86 टक्के आहे.
मध्ययुगीन काळापासून ते
आधुनिक काळापर्यंत हे क्षेत्र
मोठ्या आणि समृद्ध
पंजाब प्रांताचा भाग
होते.1947 मध्ये देशाच्या विभागणी
करण्यात आली त्यामुळे
पंजाब प्रांताचे दोन
पूर्व व पश्चिम
भागात विभाजन झाले.
विभाजनानंतर पूर्व पंजाबकडे राजधानी
नव्हती, मार्च 1948 मध्ये पंजाब
सरकारने भारत सरकार
सोबत चर्चा करून
नवीन राजधानी म्हणून
शिवालिकमधील पायथ्याच्या क्षेत्रात मान्यता
देण्यात आली.
चंदीगड केंद्रशासित प्रदेशाचा
पहिले धूम्रपान मुक्त
शहर म्हणून ओळखले
जाते. प्रदेशातील मुख्य
भाषा इंग्रजी आहे.
गिद्धा,संमी,भांग्रा,झुमार ई. विविध
नृत्य प्रकार आहेत.
येथे प्रमुख दोन
उत्सव साजरे केले
जातात,’रोज फेस्टिवल‘
झाकीर हुसेन रोज
गार्डन येथे व
‘मँगो फेस्टिवल‘ मॉन्सून
मध्ये सुखणा लेक
जवळ.
चंदीगड मध्ये Parrot Bird Sanctuary व Sukhna Wildlife Sanctuary हे महत्वाची
ठिकाण आहेत. तसेच
पर्यटनाच्या दृष्टीने सुखना लेक,सरकारी संग्रहालय आणि
कलादालन,चट्टबिर झू ई.
ठिकाणे आहेत.धन्यवाद |
Source-chandigarh.gov.in
हेही वाचा – भारतातील National Highway ला नंबर कशा प्रकारे दिले जातात ?
हेही वाचा – Mobile Number हा 10 अंकीच का असतो ?