जैविक कीटकनाशके आणि त्यांचे महत्त्व,गोनीओझस(जैविक कीटकनाशक):नारळाच्या काळ्या डोक्याच्या सुरवंटाचे व्यवस्थापन.

जैविक कीटकनाशके आणि त्यांचे महत्त्व, 
 गोनीओझस(जैविक कीटकनाशक): नारळाच्या काळ्या डोक्याच्या सुरवंटाचे व्यवस्थापन.

▪️ जीवो जीवस्य जीवनम् !

म्हणजे एक जीव दुसऱ्या जिवास खाऊन जगतो या संस्कृत श्लोकानुसार नैसर्गिक तंत्राचा वापर पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी करणे शक्य आहे.जैविक कीटकनाशके ही नैसर्गिकरीत्या वनस्पती, प्राणी व सूक्ष्मजीव यापासून प्राप्त होणारी बिन विषारी कीटकनाशके आहेत तसेच ती पर्यावरणास अनुकूल आहेत शाश्वत शेतीतील मुख्य घटक आहेत. ती सामान्यतः रासायनिक कीटकनाशकांचा प्रमाणे वापरली जातात परंतु ती पर्यावरणास अनुकूल मार्गाने कीटक व्यवस्थापन साध्य करतात. त्याचप्रमाणे सर्व कीटक व्यवस्थापन व प्रभावी नियंत्रणासाठी योग्य सुत्रीकरण आणि अनुप्रयोग आवश्यक आहे. 

जैविक कीटकनाशके आणि त्यांचे महत्त्व,गोनीओझस(जैविक कीटकनाशक):नारळाच्या काळ्या डोक्याच्या सुरवंटाचे व्यवस्थापन.


▪️ रासायनिक कीटकनाशकांचे दुष्परिणाम :

रासायनिक कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतीच्या उत्पन्नात वाढ होते मात्र हे वाढीव उत्पादन तात्पुरत्या स्वरूपाचे असते. याचे दीर्घकालीन दुष्परिणाम जास्त असल्याचे दिसून आले आहे. कीटकांचा नाश करणारी कीटकनाशके अर्थातच विषारी असतात. त्यामुळे ज्याप्रमाणे उपद्रवकारक कीटक मरतात त्याचप्रमाणे काही उपयुक्त जीवजंतुही बळी पडतात.रासायनिक कीटनाशकांच्या वापरामुळे मृदेवर व तसेच मानवी शरीरावर अनेक गंभीर परिणाम होतात. तसेच यांचा जीवसृष्टीलही धोका अधिक आहे.

▪️ जैविक कीटकनाशके :

रासायनिक कीटकनाशकांच्या वापरातुन पिकांवर व पर्यायाने आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळणे या उद्देशातून सेंद्रिय शेतीची संकल्पना पुढे आली.जैविक कीटकनाशके फक्त आपल्याला अपेक्षित असलेल्या हानिकारक कीटकांवर परिणाम करतात. परंतु रासायनिक कीटकनाशके हानीकारक किटकांबरोबर शेतकऱ्यास उपयुक्त कीटक व पक्षी प्राण्यांवरही परिणाम करतात. जर आपणाला निरोगी व दिर्घरुपी आयुष्य जगायचं असेल तर आपण जैविक तंत्राचा वापर आपल्या जीवनात तसेच पर्यायाने शेतीतही केला पाहिजे. 

▪️ गोनिओझस विषयी:

गोनिओझस नेफॅण्टीडीस हा मोठ्या प्रमाणावर वापरला जाणारा परजीवी आहे. गोनिओझसची मादी अंडी व अळ्यांची काळजी घेते. याच्या अळ्या परजीवी असतात. त्या हानिकारक कीटकनाशकांचा द्रवपदार्थ खातात.गोनिओझस वापराचे प्रमाण अलीकडच्या काळात कर्नाटक केरळ आणि इतर राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. हे जैवकीटकनाशक घरगुती बागांसाठी वापरले जाऊ शकते. 

▪️ नारळाच्या काळ्या डोक्याच्या सुरवंटाचे व्यवस्थापन :

गोनिओझस नारळाच्या झाडावर पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव कमी करतात. इतर उपायांच्या तुलनेत गोनिओझसचा वापर पर्यावरण पूरक व स्वस्त आहे. आंध्र प्रदेशातील किनाऱ्यावरील भागांमध्ये नारळावर काळ्या डोक्याच्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. विशेषतः पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये ही पाने खाणारी अळी नारळावरील महत्त्वाची कीड मानली जाते. ही अळी पानावरील हिरवा भाग खाऊन चोथा बाहेर टाकते.पानांवरील हिरवेपणा नष्ट झाल्यामुळे अन्ननिर्मितीची प्रक्रिया थंडावते आणि झाड अशक्त आणि आजारी दिसू लागते. अळीच्या तीव्र प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये फुलोऱ्याचे प्रमाण कमी राहते, नारळांची अपक्व अवस्थेतच गळ होते, झाडाची वाढ खुंटते. अशावेळी गोनिओझस मित्रकीटकांच्या प्रसारणानंतर कोणत्याही रसायनांच्या वापराशिवाय दिर्घकाळापर्यंत किडीपासून नियंत्रण मिळवणे शक्य होते.

▪️ अधिक माहितीसाठी : 

जैविक घटकांचे उत्पादन व उपयोग या कर्यानुभवात्मक शिक्षण प्रकल्पाचे व्यवस्थापन डॉ. संतोष मोरे सर ,गौरी जवळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे .यात कुणाल तांदुळकर, वैभव नरळे, वैष्णवी पाटील, निशी गुप्ता, मिशेल जॉन, श्रावणी पालाघाट हे विद्यार्थी परिश्रम घेत आहेत.

              या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी व उत्पादनांची खरेदी करण्यासाठी संपर्क:- डॉ. संतोष मोरे (७५८८९५५५०१)(प्राध्यापक, कृषी महाविद्यालय पुणे)

2 thoughts on “जैविक कीटकनाशके आणि त्यांचे महत्त्व,गोनीओझस(जैविक कीटकनाशक):नारळाच्या काळ्या डोक्याच्या सुरवंटाचे व्यवस्थापन.”

Leave a Comment