दमण व दीव हे भारतातील केंद्रशासित प्रदेशांपैकी एक प्रदेश आहे. दमण,दीव व गोवा हे देश स्वतंत्र झाल्यानंतरही पोर्तुगीजांच्या अधिपत्याखालील प्रदेश होते. तसेच 1961 मध्ये दमन व दीवला भारताचा अविभाज्य अंग बनविण्यात आला. दमण व दीव ची स्थापना 30 मे 1987 मध्ये गोवा राज्याला राज्याचा दर्जा दिल्यानंतर झाली तसेच हा एक स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देण्यात आली. प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने 2020 मध्ये दादरा आणि नगर-हवेली केंद्रशासित प्रदेशासह दमण व दीव एकत्र केले गेले. हा प्रदेश पूर्वेकडील गुजरात,पश्चिमेला अरबी समुद्र,उत्तरेमध्ये कोलक नदी, ई. भागांमध्ये पसरलेला आहे व मुंबई पासून दमन अवघ्या 193 किलोमीटर लांब आहे. स्थानिक पातळीवर दमन जिल्हा आणि दीव जिल्हा हे जिल्हा पंचायत द्वारे शासित आहे. 1509 मध्ये पोर्तुगीज आणि गुजरातच्या शासकांमधील झालेल्या युद्धात पोर्तुगीजांनी दीव–दमनवर कब्जा केला व 1961 पर्यंत ह्या प्रदेशांवर पोर्तुगीजांनी राज्य केलं.
दमण व दीव यांचे एकूण क्षेत्रफळ 112 चौरस किलोमीटर इतके आहे. तसेच 2011 च्या जनगणनेनुसार तेथील जनसंख्या 2 लाख 42 हजार 911 इतकी आहे. या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी म्हणून दमन ची ओळख आहे.
तेथील मुख्य भाषा गुजराती आहे. तसेच तेथे बहुधर्मिय लोक राहतात. दवन नदी ही तेथील मुख्य नदी आहे. मंडी (Mando), व्हर्दिगाव विरा(Verdigao vira) हे तेथील मुख्य नृत्य प्रकार आहे. ही नृत्य तेथील पारंपरिक नृत्य प्रकार आहे. कृषी क्षेत्रातही दमन व दिव अग्रेसर आहेत तेथे प्रामुख्याने भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, गहू, शेंगदाणे, विविध प्रकारच्या डाळी,चिक्कू,आंबा,नारळ, केळी व ऊस ई. प्रमुख पिके आहेत. तसेच या प्रदेशामध्ये कोणतेही मोठे जंगल नाही. तेथे उपलब्ध असलेल्या समुद्रकिनाऱ्यामुळे तेथे मासेमारी केली जाते. तसेच अर्थव्यवस्थेत शेती व मासेमारीचे जास्त वर्चस्व आहे. दमण व दीवला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यामुळे ही शहरे व्यापारी केंद्र बनली आहेत. पर्यटनाच्या दृष्टीनेही दमण व दीव हे प्रदेश अग्रेसर आहे. तेथे पोर्तुगिजांनी उभारलेल्या इमारती, दिऊ किल्ला,St Paul’s Church, St Thomas Church,Nagoa beach,Ghoghla Beach इ, पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची स्थळे आहेत.
दमण आणि दीव या दोन प्रदेशाबद्दल एक चुकीचा गैरसमज बऱ्याच जणांचा असतो की, दमण आणि दीव हे एकमेकांचे शेजारी प्रदेश आहे पण ह्या प्रदेशाचा नकाशा बघून आपण समजू शकतो की, दीव हा गुजरात राज्यामधील जुनागढ जिल्ह्याच्या दक्षिणेकडचा प्रदेश आहे तर दमन हा मुंबई-गुजरात लगत असलेला प्रदेश आहे व त्यांच्यामध्ये 700 किलोमीटर एवढे अंतर आहे.