दादरा आणि नगर हवेली- नैसर्गिक सौंदर्याची भूमी. मराठा आणि पोर्तुगीज
यांच्या दीर्घ संघर्षातून 17 डिसेंबर
1779 मध्ये मराठा सरकारने मैत्रीची
खात्री करण्यासाठी दादरा नगर
हवेलीतील गावांमधून 12,000 रुपयांचा एकत्रित महसूल
पोर्तुगालला भरपाई म्हणून दिला.
2 ऑगस्ट 1954 पर्यंत पोर्तुगीजांनी या
प्रदेशावर राज्य केले. 18 व्या
शतकाच्या शेवटी पोर्तुगाल हे
या प्रदेशात आले.1954
ते 1961 पर्यंत हा प्रदेश
” स्वतंत्र दादरा आणि नगर-हवेली प्रशासन ” म्हणून
ओळखला जात होता.
11 ऑगस्ट 1961 मध्ये दादरा नगर
हवेली भारतामध्ये विलीन
झाले व भारताचा
अविभाज्य घटक बनले.
तसेच या प्रदेशाला
केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित
केले. दादरा नगर
हवेली,दमण आणि
दीव हे केंद्रशासित
प्रदेश भारताच्या पश्चिम भागात
गुजरात ते उत्तर
महाराष्ट्र या प्रदेशांमध्ये
स्थित आहेत.
दादरा नगर हवेली
चे एकूण क्षेत्रफळ
491 Sq.KM आहे. सिल्वासा (Silvassa) ही तेथील
राजधानी आहे. येथील
मुख्य भाषा गुजराती
व हिंदी आहे
व येथे 79 % आदिवासी
लोक राहतात. या
प्रदेशांमध्ये मुख्यत: खरीप हंगामातील
भात हे मुख्य
पीक आहे. तसेच
नागली व डोंगर
बाजरी ही पिके
सुद्धा घेतली जातात. फळांमध्ये
आंबा,चिकू,केळी
आणि ऊस यांचे
सुद्धा पीक घेतले
जाते. भौगोलिकदृष्ट्या 40 टक्के
क्षेत्र हे जंगलांनी
व्यापलेले आहे. Dan udyog Sahakari Sangh Ltd अंतर्गत येथील उद्योग
क्षेत्राचा विकास झाला.
दादरा आणि नगर
हवेलीमध्ये सर्व धर्मीयांचे
सण-उत्सव साजरे
केले जातात. बरश
हा एक मोठा
सण येथे साजरा
केला जातो ज्याचे
महत्व दिवाळी या
सणाइतके मानले जाते. दादरा
आणि नगर हवेलीच्या
विविध प्रकारच्या लोक
आणि आदिवासी नृत्यामध्ये
तारपा नृत्य, घेरिया
नृत्य, भवाडा नृत्य, ढोल
नृत्य आणि तूर
आणि थाली नृत्य
ई. प्रमुख नृत्य
आणि गायन प्रकार
आहेत. पर्यटनाच्यादृष्टीने हा
प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे
कारण हा प्रदेश
निसर्ग प्रकृतीने नटलेला आहे.
दादर आणि नगर
हवेली असंख्य स्वदेशी
आदिवासी गटांचे घर आहे.
यापैकी, वारली जमातीचे अतुलनीय
कौशल्य आणि कुशल
सर्जनशीलता त्यांच्या भिंतींच्या चित्रांमध्ये
स्पष्ट आहे. चौरस,
वर्तुळ आणि त्रिकोणासारख्या
अत्यावश्यक घटकांसह, आदिवासी एक
साधी भिंत बदलून
सभोवतालच्या जगाची त्यावर छाप
पाडतात. सूर्य, चंद्र, झाडे
आणि निसर्ग यांची
त्यांच्या कलेद्वारे प्रशंसा करतात.
वारली पेंटिंगमध्ये अनेक
आकृतिबंध आहेत जे
दैनंदिन जीवनाला उत्सव म्हणून
दर्शवतात .
अफाट निसर्गसौंदर्य
आणि हिरवळीने संपन्न,
दादरा आणि नगर
हवेली देशातील सर्वात
सुंदर केंद्रशासित प्रदेशांपैकी
एक आहे. वनगंगा
तलाव, हिरवा वन
उद्यान, दुधनी, सातमलिया हरण
उद्यान, वासोना लायन सफारी,
नक्षत्र गार्डन ही आणखी
काही आकर्षणे आहेत.