‘दिल्ली’ राष्ट्रीय राजधानी प्रदेश .

 दिल्ली भारताची राजधानी तसेच
केंद्रशासित प्रदेश.

     भारताच्या इतिहासामध्ये दिल्ली या प्रदेशाचा
उल्लेख खूप वेळा
आढळतो. राजकीय,आर्थिक,लष्करी
या दृष्टीने दिल्ली
हा प्रदेश अत्यंत
महत्त्वाचा आहे.वेदिक
काळामध्ये इंद्रप्रस्थ या नावाने
ओळखला जाणारा हा
एक प्रदेश आहे.
तसेच कुरु राष्ट्राची
राजधानी म्हणून देखील या
प्रदेशाचा उल्लेख आहे.

राष्ट्रीय राजधानी प्रदेश,National Capital territory

     दिल्ली या प्रदेशावर
अनेक परकीय आक्रमणे
झाली, तसेच वेगवेगळ्या
साम्राज्यांनी या प्रदेशावर
अधिकार गाजवले.अनेक परकीय
सत्तांचा या प्रदेशावर
अधिकार होता, उदा.मुघल,मराठा,इंग्रज,.

     1 नोव्हेंबर
1956 रोजी दिल्ली हा प्रदेश
भारताचा केंद्रशासित प्रदेश म्हणून
घोषित करण्यात आला
तसेच 1 फेब्रुवारी 1992 रोजी या
प्रदेशाला भारताची राष्ट्रीय राजधानी
प्रदेश ( National Capital
territory
) NCT म्हणून घोषित करण्यात आला.
दिल्ली चे एकूण
क्षेत्रफळ 1483 Sq Km येवढे आहे. 2011 च्या
जनगणनेनुसार तेथील एकूण लोकसंख्या
16,787,941 एवढी आहे.

      केंद्रशासित
प्रदेशाचा कारभार हा lieutenant governor पाहत
असतो. दिल्ली येथे
तेथील कामकाज मुख्यमंत्री
व lieutenant governor पाहत असतात.
देशाची राजधानी असल्याने हा
प्रदेश अत्यंत महत्त्वाचा आहे.हिंदी,इंग्रजी,पंजाबी व
उर्दू या येथील
प्रमुख भाषा आहे
तसेच दिवाळी,होळी,ईद हे
प्रमुख उत्सव साजरे केले
जातात.

     अनेक ऐतिहासिक वास्तू,भारताची
राजधानी,दीर्घकालीन इतिहास यामुळे
हा प्रदेश पर्यटनाच्या
दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे.
कुतुब मिनार,हुमायून
कबर,जंतर-मंतर,लाल किल्ला,इंडिया गेट,बिर्ला
मंदिर,गुरुद्वारा बंगला
साहिब, लोटस टेम्पल,महात्मा गांधी स्मृती, ई. प्रमुख
ऐतिहासिक ठिकाणे आहेत.

Read More – Petrol Diesel GST – सुटेल का महागाईचा तिढा ?

Read More – चंदनाच्या लाकडाची 10,000 रुपये/ किलो इतकी किंमत का आहे ?

Leave a Comment