परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स – भारताच्या शैक्षणिक क्षेत्राच्या कामगिरीचा आढावा

        सध्याचे केंद्र सरकारमधील शिक्षण मंत्री मा. श्री. रमेश पोखरीयाल यांनी ३ वर्षापूर्वी सुरु केलेल्या एका विशिष्ट अभियान व योजनेचा २०२१ चा निकाल जाहीर केला तो म्हणजे परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स. हा इंडेक्स केंद्र सरकार सलग तीन वर्षांपासून काढत आहे. राज्याच्या शिक्षण क्षेत्राला चालना मिळून क्षेत्र जलद गतीने प्रगत व्हावे यासाठी या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शिक्षण हे जीवनाच्या यशाची गुरुकिल्ली आहे आणि या युक्तीला आधार बनवून हे प्रमाण जाहीर करण्यात आले

           जून २०२१ मध्ये २०१९-२०२० या साली कोणत्या राज्यांनी चांगली कामगिरी बजावली हे जाहीर केले गेले. त्या नुसार अनेक राज्य व केंद्रशासित प्रदेश हे शिक्षण क्षेत्रात प्रखर प्रकाशझोतात आले. यामध्ये अंदमान निकोबार ,केरळ,पंजाब,तामिळनाडू यांनी अतिशय उत्तम कामगिरी केली असून बाकी राज्यांसाठी आदर्श बनले आहेत . 
     PGI – हा इंडेक्स कोणत्या प्रमाणावर ठरवला जातो ते प्रमाण खालील प्रमाणे लागू पडतात 
Access( उपलब्धता)
Equity ( गरजेनुसार दिलेली सुविधा)
governance process (शासन व्यवस्था)
Infrastructure facilities (पायाभूत सुविधा)
Learning Outcomes (शिक्षणाचे परिणाम)  
केंद्र सरकारच्या या योजनेचे फायदे- 
१) राज्यांमध्ये स्पर्धात्मक वृत्ती तयार होऊन प्रत्येक राज्याचा शिक्षणाचा दर्जा उंचावेल 
२) ) सामाजिक परिणाम
 – छोट्या गावातील होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळेल. 
 – देशाच्या कानाकोपऱ्यात शिक्षणाची सुविधा निर्माण होईल. 
)आर्थिक परिणाम
मुले हे देशाचे भविष्य आहे ,तर आपण या भविष्याला जपले व त्यावर आज गुंतवणूक केली तर ते पुढे आपल्या देशाची आर्थिक परिस्तिथी सुधारायला मदत करतील . 
 )राजकीय परिणाम
मुलांना सुविधा उपलब्ध करून दिल्यावर ते आपल्या देशाचे पुढील प्रशासकीय अधिकारी किंवा मंत्री बनतील. त्यामुळे त्यांना व्यवस्थितरीत्या शिक्षण दिल्याने ते आपल्या देशासाठी उच्च दर्जाच्या योजना व गरिबांसाठी कल्याणकारी काम करण्यात सक्षम होतील . 
         जसे फायदे असतात तसे काही प्रमाणात तोटे ही असतात. शिक्षण क्षेत्रात मागच्या काळात काही भ्रष्टाचार उघडकीस आले होते व केंद्राकडून आलेल्या निधीचा वापर अनेक वेगवेगळ्या कामासाठी केला गेला. 
         शिक्षण क्षेत्र हे अतिशय उल्लेखनीय काम करणारे क्षेत्र आहे परंतु वरील नमूद त्रुटीवर सरकारने लक्ष देण्याची गरज आहे .तसेच जे राज्य प्रगतीच्या मार्गावर आहेत त्यांना आणखी चालना देऊन या योजनेतून आदर्श जगासमोर उभा केला पाहिजे. जसे शरीराला श्रमाकडे,बुद्धीला मनाकडे आणि हृदयाला भावानेकडे वळवणे म्हणजे शिक्षण होय.
                                                       -उत्कर्ष ठोंबरे .

Leave a Comment