पोस्टाचा पिनकोड ६ अंकीच का असतो?

          ”माझ्या मामाच पत्र हरवलं,ते मला सापडलं ‘ पासून ते “चिट्ठी आयी है,आयी है चिट्ठी आयी है” यांसारख्या गाण्यांमधून किंवा दुसऱ्या माध्यमातून आपल्या सर्वांना पोस्टाच्या सेवेचा अनुभव नक्कीच आला असावा. देशाच्या संदेश देवाणघेवाण क्षेत्रात भक्कमपणे विणलेल जाळ, ज्यावेळी मोबाईलचा पर्यायही उपलब्ध नव्हता तेव्हा स्वतःच्या भावना इतरांपर्यंत पोहचवण्याच आणि माणसाला माणसाशी जोडण्याचं हे एक प्रभावी साधन होते. तर आजच्या ह्या लेखामध्ये आपण पोस्टाच्या पिनकोड बाबत एक रंजक माहिती जाणून घेणार आहोत की पिनकोड हा ६ अंकीच का असतो?

          भारतामध्ये १५ ऑगस्ट १९७२ सालापासून पोस्टाची व्यवस्था जलदगतीने पुढे नेण्यासाठी Pincode ही सेवा अमलात आणली गेली. भारतामध्ये पिनकोड साठी एकूण ९ प्रदेश(region) आहेत त्यामध्ये ८ प्रदेश हे भौगोलिकदृष्ट्या ठरवले आहेत तर नववा आर्मी पोस्ट सर्व्हिस साठी वेगळा ठेवलेला आहे. पिनकोडमधील  ६ अंक आपल्याला खालीलप्रमाणे माहिती दर्शवतात: 
        Image Source-The better India.



            पहिला अंक – देशातील प्रदेश (Region) दर्शवतो

            पहिले दोन अंक  – राज्याचं नाव दर्शवतात 
            पहिले तीन अंक  – जिल्हा दर्शवतात 
      उरलेले ३ अंक – जिल्यातील पोस्ट ऑफिसचा क्रमांक 



       आता वरील माहितीनुसार आपण पुणे जिल्यातील पिनकोड  ४११००५ आपल्याला काय सांगतो हे आपण समजून घेवू. 

      ४ – भारतातील पश्चिम भाग दर्शवतो
      ४१- महाराष्ट्र राज्य क्रमांक दर्शवतो
      ४११- पुणे जिल्हा क्रमांक दर्शवतो
      ००५- शिवाजीनगर येथील पोस्ट ऑफिस क्रमांक 
याप्रमाणे वरील दिलेल्या माहितीनुसार आपण आपल्या भागातल्या पोस्ट ऑफिस पिनकोड बाबतची माहिती जाणून घेवू शकतो.
                         धन्यवाद!
                                       -ऋषिकेश उगले ,सौरभ बिनवडे .

Leave a Comment