भारताचे पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपण, प्रारंभ

         भारतातील पहिल्या खाजगी रॉकेटचे शुक्रवारी 18 नोव्हेंबर 2022 रोजी यशस्वीरित्या प्रक्षेपण झाले. आंध्र प्रदेश मधील श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून विक्रम – एस ( Vikram – S ) या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात आले. 

भारताचे पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपण, प्रारंभ

        हैदराबाद स्थित स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (Skyroot Aerospace Private Limited ) या खाजगी कंपनीने विकसित केलेले पहिले रॉकेट इस्रो (ISRO) अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था च्या माध्यमातून ( Vkram – S ) विक्रम – सबऑर्बिटल या पहिल्या खाजगी रॉकेटचे अंतराळात यशस्वीरित्या प्रक्षेपण करून इतिहास घडवला आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री आणि पंतप्रधान कार्यालयाचे अणुऊर्जा आणि अवकाश राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आंध्र प्रदेशात श्रीहरीकोटा येथे स्वतः उपस्थित राहून हा क्षण अनुभवला.

        भारतात 2020 पर्यंत कोणत्याही खाजगी कंपनीला अवकाशात रॉकेट प्रक्षेपण करण्यास परवानगी नव्हती, परंतु Spacecom Policy अंतर्गत 2020 पासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाजगी व सार्वजनिक भागीदारीतून अंतराळात रॉकेट प्रक्षेपणास मंजुरी दिली.

 विक्रम एस रॉकेट ची वैशिष्ट्ये :

▪️ या रॉकेट ची उंची 6 मीटर तसेच वजन 500 किलो पेक्षा अधिक

▪️ या रॉकेटच्या इंजिनला भारताचे माजी राष्ट्रपती डॉ ए.पी.जे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे.( Kalam 80 )

▪️ हे रॉकेट जमिनीपासून 100 किलोमीटर उंचीवर जाते आणि त्यानंतर समुद्रात कोसळते. या रॉकेट ने 89.5 किलोमीटरच्या उंची सह अवकाशाची सीमा गाठली व निर्धारित मार्गाने बंगालच्या उपसागरात कोसळले. या प्रक्रियेचा एकूण कालावधी केवळ 300 सेकंद इतकाच आहे.

▪️ 200 इंजिनीयर कडून केवळ दोनच वर्षात या रॉकेट ची निर्मिती करण्यात आली व जगातील सर्वात स्वस्त रॉकेट म्हणून याची ओळख आहे.

▪️ कमी वजनाचे उपग्रह घेऊन जाण्याची क्षमता या रॉकेट मध्ये आहे.

या मोहिमेला प्रारंभ (The Beginning ) असे नाव देण्यात आले आहे व तसेच भारताच्या स्टार्टअप चळवळीतील हा एक निर्णायक टप्पा आहे.

स्पेस किड्झ इंडिया, बॅझूमक्यू आर्मनिया आणि एन स्पेस टेक इंडिया या तीन पेलोड्सचे वहन विक्रम एस या रॉकेटमधून करण्यात आलं आहे.

Read more – अंतराळात उपग्रह पाठवण्यासाठी PSLV व GSLV यांचा कशाप्रकारे उपयोग केला जातो ?

Read More – Ballistic आणि Cruise Missile चा युद्धात कशाप्रकारे वापर केला जातो ?

1 thought on “भारताचे पहिले खाजगी रॉकेट प्रक्षेपण, प्रारंभ”

Leave a Comment