भारतात फटाके कोठे बनवले जातात? Firecrackers

      दिवाळी म्हटलं की चवदार फराळ, नवनवीन कपडे, भरपूर मजा आणि फटाक्यांची आतिषबाजी यांची आठवण येते. दिव्यांच्या लखलखत्या प्रकाशने दिवाळीची रात्र प्रकाशमय होते आणि आनंद हा वातावरणात संचारलेला असतो. हेच दिवाळीचे दिवस जवळ येत असताना फटाक्यांपासून होणारे वायू प्रदूषण यांवर बऱ्याच चर्चा ऐकण्यास मिळतात. तर आजच्या या लेखामधून फटाके कोठे बनवले जातात व त्यात कोणत्या गोष्टींचा समावेश असतो याची माहिती जाणून घेणार आहोत.

भारतात फटाके कोठे बनवले जातात? Firecrackers

      एकोणिसाव्या शतकात भारतातील प्रथम फटाक्याचा कारखाना हा कलकत्ता येथे स्थापन झाला. तमिळनाडू येथील शिवकाशी हे शहर फटाक्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. भारतामधील फोडले जाणारे सर्व फटाकडे या शहरातून निर्यात होतात. शिवकाशी या शहराला फटाकड्याचा कारखाना असे संबोधले जाते. शिवकाशी मध्ये हजार पेक्षा जास्त फटाका बनवण्याचे कारखाने आहेत. फटाक्यांचा शोध चीनमध्ये लागला होता, तेथे पूर्वीपासून फटाक्यांचे उत्पादन केले जायचे. 1980 पर्यंत जगामध्ये सर्वात जास्त फटाक्यांचे उत्पादन करण्यामध्ये चीन अग्रेसर होता. त्यानंतर भारतात तमिळनाडूमधील शिवकाशी या शहरात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचे उत्पादन होऊ लागले व भारत जगातील 2 नंबर चा फटाक्यांचे उत्पादन करणारा देश ठरला. शिवकाशी मध्ये बनवलेले फटाके बाहेरच्या देशांमध्ये निर्यात केले जातात.

    फटाके बनविण्यासाठी विविध प्रकारचे रासायने वापरले जातात. उदा. पोटॅशियम नायट्रेट (Potassium nitrate) ,चार्कॉल (Charcoal) , सल्फर (Sulphur) , स्ट्रानियम (Starnium), बेरियम (Barium), कॉपर (Copper), कॅल्शियम (Calcium),. ई. विविध प्रकारचे रासायनिक पदार्थ विविध रंगासाठी वापरले जातात.

शिवकाशी या प्रदेशात असणारा कमी पाऊस व कोरडे हवामान यामुळे या प्रदेशात मोठ्या प्रमाणावर फटाक्यांचे उत्पादन केले जाते. दिवाळीपूर्वीच या काही महिन्यांमध्ये येथे मोठ्या प्रमाणावर मजुरांची गरज भासते व त्यासाठी आवश्यक असणारे मजूर हे बाहेरील राज्यातून येतात.

         सध्या बाजारामध्ये विविध प्रकारचे हरित फटाके आले आहेत तर हे हरित फटाके म्हणजे काय ? हे आपण जाणून घेणार आहोत. हरित फटाके हे सामान्य फटाक्यांपेक्षा 40 ते 50 टक्के कमी प्रमाणात प्रदूषण करतात. साध्या फटाक्यांपेक्षा हरित फटाके कमी प्रमाणात प्रदूषण करतात. हरीत फटाक्यांमध्ये सामान्य फटाक्यांच्या तुलनेत दारूगोळा हा कमी प्रमाणात भरलेला असतो तसेच या फटाक्यांमध्ये विविध रंगांचे विविध प्रकाराचे कमी आवाजाचे फटाके असतात. नायट्रोजन, कार्बन मोनॉक्साईड,सल्फर ई. रसायनांचे प्रमाण हे अत्यल्प असते.

Read More- भारतात हिऱ्यांचा व्यापार कशाप्रकारे केला जातो ?

Read More- भारताच्या अन्न सुरक्षेवर येवू शकते भयंकर संकट, कोण आहे आक्रमक ?

Leave a Comment