भारतात हिऱ्यांचा व्यापार कशाप्रकारे केला जातो ?

       मध्यप्रदेश राज्यातील छतरपुर जिल्हा आजकाल खूप चर्चेचा विषय ठरत आहे. येथील बक्सवाहा जंगलाच्या जागेवर हिऱ्यांचे विपुल प्रमाणात साठे असल्याने तेथे हिऱ्याची खाण उभारण्याचा प्रकल्प सरकारने आखला आहे आणि त्यामुळे तब्बल 2 लाख वृक्षांची कत्तल या जंगलात करावी लागणार असा दावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे तेथील स्थानिक नागरिकांचा रहिवास आणि व्यवसाय या बद्दल खूप समस्या निर्माण होणार आहेत. आणि या पार्श्वभूमीवर चर्चेत आलेला विषय म्हणजे हिऱ्यांबद्दल आपण आजच्या लेखात महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

        हिऱ्यांच्या बाजारात भारत हा सतराव्या शतकापर्यंत अग्रेसर होता. संपूर्ण जगात हिऱ्यांमध्ये भारताचा दबदबा कायम होता पण 1726 मध्ये ब्राझीलमध्ये भारतानंतर हिरे सापडले, तसेच आफ्रिकेमध्येही हिऱ्यांच्या खाणींचा शोध लागला आणि त्यांचे उत्पादन सुरू झाले. सध्या नैसर्गिक हिरे रशिया,बोत्सवाना,ऑस्ट्रेलिया, कॅनडा, साऊथ आफ्रिका या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात. तसेच हिरा जमिनीमध्ये 160 किमी किंवा त्यापेक्षा खोल पृथ्वीच्या अंतर्भागात अति दाब अति तापमानात तयार होतो. अंतर्भागातील जास्त दबाव आणि तापमानामुळे कार्बनचे अनु अनोख्या प्रकारे घट्ट होतात आणि त्यामुळे हिऱ्यांची निर्मिती होते. नैसर्गिकरित्या एक हिरा बनण्यासाठी हजारो वर्षे लागतात, त्यामुळे त्याची किंमत ही त्यानुसारच जास्त आकारली जाते. हिऱ्यांमध्ये 100 % कार्बन चे मिश्रण असते व जगातील सर्वात कठीण धातू म्हणून हिऱ्याला ओळखले जाते.
        अजूनही भारत हा हिऱ्यांच्या व्यापारामध्ये अग्रेसर देश मानला जातो आणि जगातील 10 पैकी 9 हिरे हे भारतात पॉलिश केले जातात. भारताच्या GDP मध्ये 7 % चा वाटा हा सोने व हिरे यांच्या व्यापारातून येतो आणि भारतामध्ये एकूण 3 % GST हिऱ्यांवर आकारला जातो. तसेच भारतातील सुमारे 1 कोटी लोकांना ह्या व्यापारामुळे रोजगार निर्माण झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्याचप्रमाणे हिऱ्यांमुळे परकीय चलन मिळकत (FEE) चा देशाच्या व्यापाराला फायदा होतो आणि परकीय गुंतवणूकीलादेखील चालना मिळते.
            भारतात हिऱ्यांच्या खाणी ह्या पन्ना बेल्ट(मध्य प्रदेश),बंदर प्रोजेक्ट(मध्य प्रदेश),कोल्लूर खाण(आंध्र- प्रदेश),गोलकंडा खाण (आंध्र प्रदेश) या ठिकाणी आहे. भारतातील 90 % हिऱ्यांचे साठे हे मध्यप्रदेश राज्यात आहेत आणि सुरत येथे हिऱ्याची पॉलिश आणि आकार देण्याचे काम केले जाते, ज्याची ख्याती पूर्ण जगात प्रसिद्ध आहे म्हणूनच सुरत शहराला The Diamond City of India” म्हणून ओळखले जाते. तसेच Bharat  Diamond  Bourse (Mumbai) हे जगातील सर्वात मोठे हिऱ्यांचे व्यापारी केंद्र आहे.
          शोध, खाण,वर्गीकरण,कटिंग आणि पॉलिशिंग, दागिने विक्री या सर्व प्रक्रियेतून हिरा तयार करून विकला जातो. हिऱ्यांच्या खाणीतून हिरे बाहेर काढून त्याचे वर्गीकरण करतात,नंतर हे हिरे कटिंग आणि पॉलिशिंग करण्यासाठी सुरत आणि मुंबई येथे पाठवले जातात आणि तेथून ते हिरे दागिन्यांच्या स्वरूपात विकले जातात किंवा हिरे हे कठोर असल्याने त्यांचा काच किंवा बाकीचे अवजारे कापण्यासाठी वापर होतो. हिरे शुद्ध आहे की नाही याची खात्री आणि प्रामाणिकता ही सरकारच्या वतीने करण्यात येते. शुद्ध हिरे हे पाण्यात तळाला जातात तर अशुद्ध हिरे हे पाण्यावरच तरंगतात. तसेच हिरे हे 100% कार्बन ने तयार झाल्यामुळे 650°C ला त्यांची वाफ होते व ते हवेत मिसळून जातात.
         अशाप्रकारे आजच्या लेखातून आपण हिऱ्यांचा व्यापार, भारतातील स्रोत, त्यांची बनण्याची पद्धत याबद्दल सविस्तरपणे माहिती जाणून घेतली. या लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.

                                                        -ऋषिकेश उगले. 
                                                        -सौरभ बिनवडे.

Leave a Comment