भारतामध्ये मतदानाचे EVM कोठे बनवले जाते ? EVM Machine

         भारतातील प्रत्येक प्रौढ नागरिकास मतदानाचा हक्क आहे. आपल्याला हवा तो उमेदवार निवडण्यासाठी आपण मतदान करतो. हेच उमेदवार आपले व देशाचे नेतृत्व करतात. आजच्या या लेखामधून EVM machine मध्ये काय असते व ते भारतात कोठे बनवले जाते याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत.

भारतामध्ये मतदानाचे EVM  कोठे बनवले जाते ? EVM Machine

EVM ईव्हीएम मशीन चा इतिहास-

      1980 मध्ये एम बी हनिफा यांनी या ईव्हीएम मशीन चा शोध लावला. 15 ऑक्टोंबर 1980 रोजी इलेक्ट्रॉनिक संचालित वोटिंग मशीन या नावाने याचे रजिस्ट्रेशन केले होते. तमिळनाडूतील 6 शहरांमध्ये ईव्हीएम मशीन चे सर्व प्रथम प्रदर्शन मांडले होते. 1982 रोजी केरळ मधील उत्तर परावूर विधानसभा क्षेत्रात 50 मतदान केंद्रात याचा सर्वप्रथम वापर करण्यात आला. कंट्रोल युनिट (Control Unit), इ व्ही एम मशीन (EVM Machine),व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल (VVPAT) या यंत्रांचा निवडणूक प्रक्रियेमध्ये मुख्यता वापर केला जातो.

कंट्रोल युनिट (Control Unit)-

      मतदान प्रक्रियेमध्ये सर्वात महत्त्वाचे उपकरण म्हणजेच कंट्रोल युनिट आहे तसेच याला बॅलेट युनिट (Ballot Unit) या नावाने देखील संबोधले जाते. या उपकरणाचे नियंत्रण पीठासीन अधिकारी द्वारे करण्यात येते. कंट्रोल युनिट 5 Meter वायर द्वारे वोटिंग युनिट (EVM) सोबत जोडलेले असते.तसेच ही उपकरणे कोणत्याही इंटरनेट जोडणी शिवाय चालू असतात यांना इंटरनेटची आवश्यकता नसते. कंट्रोल युनिट हे मतदान कक्षा पासून काही अंतरावर पीठासीन अधिकारी यांच्या जवळ ठेवण्यात येते. पीठासीन अधिकारी ज्यावेळेस बॅलेट बटन (Ballot Button) दाबतो त्यानंतर मतदान कक्षामध्ये मतदार फक्त एका वेळेस उमेदवाराला मत देऊ शकतात. एकदा मतदान झाल्यानंतर ईव्हीएम मशीन बंद होते. पुन्हा पुढचा मतदाता आल्यानंतर पीठासीन अधिकारी द्वारे EVM मशीन चालू होते.

 EVM machine- 

         ईव्हीएम मशीन मतदान कक्षात ठेवलेली जाते. 1989 मध्ये भारत निर्वाचन आयोग व इलेक्ट्रॉनिक कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड,हैदराबाद व भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड,बेंगलोर यांच्या द्वारे ईव्हीएम मशीन चे अधिकृतरित्या उत्पादन केले जाते.EVM मशीन मध्ये सिलिकॉन पासून तयार केलेल्या साहित्यामधून ऑपरेटिंग सिस्टिम (Operating system) बनवली जाते. EVM चे उत्पादन भारतामध्येच केले जाते. उपकरणे एकदा बनवून झाल्यानंतर ती पुन्हा उघडता येत नाही.EVM मध्ये 6 volt बॅटरीचा वापर करण्यात येतो. एका ईव्हीएम मशीन मध्ये 3840 मतदान नोंद करता येतात तसेच 64 उमेदवारांचे नाव व फोटो यांची नोंद करता येते. या सर्व प्रक्रियेमुळे एक व्यक्ती एक मतदान ही संकल्पना प्रभावीपणे राबवता येते.

व्होटर व्हेरिफाईड पेपर ऑडिट ट्रेल VVPAT- 

       या उपकरणाद्वारे मतदाराने ज्या उमेदवारास मत दिले आहे त्याचे निवडणूक चिन्ह व पक्षाचे चिन्ह याची एक प्रत निघते यावरून मतदार खात्री करून घेऊ शकतात की आपण केलेले मतदान योग्य व्यक्तीला गेले आहे की नाही. या उपकरणामध्ये वापरला गेलेला कागद हा देखील एक विशिष्ट प्रकारचा असतो. भारतीय चलनाच्या नोटे सारखा व यावर काही अंक लिहिलेले असतात.

या उपकरणाद्वरे भारतीय निवडणूक आयोग यशस्वीरित्या कोणतीही निवडणूक घेऊ शकतात तसेच हे सर्व उपकरणे सुरक्षित आहेत. कोणत्याही प्रकारे ही उपकरणे हॅक होत नाही. त्यामुळे आपण निश्चिंत होऊन मतदान करू शकतो.

Read More मतदान करताना कोणत्या शाईचा वापर केला जातो ?

Read More– सिमकार्ड चा एक कोपरा कापलेला का असतो ?

Leave a Comment