भारतीय तिरंगा कोठे बनवला जातो?

         भारतीय ध्वज ‘ तिरंगा‘ हा
सर्वप्रथम 22 जुलै 1947 रोजी घटना
समितीच्या बैठकीत अधिकृत राष्ट्रध्वज
म्हणून स्वीकारण्यात आला. भारत
देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या 24 दिवस
आधी या ध्वजाला
मान्यता देण्यात आली. तिरंगा
ध्वजाची रचना मछलीपट्टनम
या ठिकाणी जन्मलेल्या
पिंगाली वेंकय्या यांनी केली
होती.

         कायद्याने हा ध्वज
खादी पासून बनवावा
आणि खास प्रकारच्या
हात कापडाचा किंवा
रेशमचा असावा असे नियम
आहेत. यासाठी महात्मा
गांधी यांनी लोकप्रिय
केलेली खादी वापरली
जाते तसेच ध्वज
निर्मितीची प्रक्रिया व वैशिष्ट्ये
ब्युरो ऑफ इंडियन
स्टॅंडर्ड (BIS) 
मार्फत ठरवले जातात.
भारतात अधिकृतरित्या तिरंगा बनवण्यासाठी कर्नाटकमधील
हुबळी शहरात कर्नाटक
खादी ग्रामोद्योग संयुक्त
संघ (KKGSS).
ही एकमेव
संस्था आहे. खादी
आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे
कर्नाटक खादी ग्रामोद्योग
संयुक्त संघाला तिरंग्याची निर्मिती
करण्याची अधिकृत परवानगी दिली
आहे. तसेच या
संघाची स्थापना 1957 मध्ये झाली परंतु
खादी बनवण्यात येथे
1982 पासून सुरुवात झाली.(KKGSS) या
ठिकाणी ध्वज बनवण्यासाठी
सर्व महिला काम
करत असतात
. संपूर्ण
जगात व भारतात
या संस्थेमार्फत सर्व
ध्वज पुरवले जातात.
खादी बनवण्यासाठीचा कच्चामाल
हा कापूस,रेशीम,
लोकर पर्यंत मर्यादित
आहे. विणलेल्या खादी
उत्तर कर्नाटकातील धारवाड
आणि बालाकोट जिल्ह्यातील
दोन हातमाग युनिटमधून
मिळतात. तयार झालेले
सर्व ध्वज हे
ब्युरो ऑफ इंडियन
स्टॅंडर्ड मार्फत तपासून घेतले
जातात तसेच त्याची
योग्यता ही तपासली
जाते. भारताचा राष्ट्रीय
ध्वज तिरंगा ची
रुंदी व लांबी
चे प्रमाण 2:3
आहे.

      ” विजयी
विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊँचा रहे
हमारा”
ह्या गीतास
1938 चा काँग्रेस अधिवेशनात झेंडा
गीत म्हणून स्वीकारले
गेले. ब्युरो ऑफ
इंडियन स्टॅंडर्ड करून प्रत्येक
ध्वज हा 18 वेळा
चेक केला जातो
.
त्या मधूनही 10% ध्वज
हे रिजेक्ट केले
जातात,त्यामध्ये कोणत्याही
प्रकारची चूक मान्य
केली जात नाही.
फ्लॅग कोड ऑफ
इंडिया 2002 नुसार ध्वज बनवताना
सर्व नियम पाळावे
लागतात, तसेच ध्वजाचा
रंग,लांबी,रुंदी,अशोक चक्राचा
रंग सर्व व्यवस्थित
आहे का नाही
सगळे बारकाईने तपासून घेण्यात येते.

Leave a Comment