मतदानाची जांभळी शाई, का करत नाही पुसायची घाई ?

 Election Ink information

      आपल्या देशात सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुसाट वेगाने सुरू असून एकमेकांवर आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झाडून मतदारांना आपल्या पक्षाची बाजू ठामपणे पटवून देण्यासाठी राजकीय नेते दिवसरात्र मेहनत घेत आहेत. लोकशाही राज्य चालवण्यासाठी निवडणुकीची गरज असते, निवडणूक म्हटली की आपल्याला लगेच प्रचारसभा,आचार संहिता,मतदान दिवस,निकाल व मतमोजणी दिवस ही संपूर्ण निवडणूक प्रक्रिया आठवते. आजच्या या लेखाद्वारे मतदान प्रक्रियेमध्ये बोटाला लावली जाणारी जांभळी शाई कोठे बनते व त्यात कोणता पदार्थ असतो याची माहिती जाणून घेणार आहोत.

मतदानाची जांभळी शाई, का करत नाही पुसायची घाई ?

      भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर 1951 रोजी सर्वात प्रथम सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया राबवली गेली होती. या निवडणूक प्रक्रियेमध्ये भारतामधून एकुण 173 मिलियन मतदार मतदान करण्यासाठी पात्र होते. एवढी प्रचंड लोकसंख्या असल्याने मतदान प्रक्रियेत अडथळा येऊ लागला कारण ओळख, चोरी यांच्या समस्येमुळे दुप्पट मतदान होऊ लागले. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी भारताचे पहिले चीफ एलेक्शन कमिशनर मिस्टर सुकुमार सेन यांनी इंडेलिबल शाई Indelible Ink वापरण्याची कल्पना सुचवली. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान  करताना बोटाला जी शाई लावली जाते ती मिटवता येत नाही तसेच कोणत्याही प्रकारे पुसता देखील येत नाही परिणामी ही शाई बोटावर काही दिवस ठळकपणे दिसते, त्यालाच इंडेलिबल शाई Indelible Ink या नावाने ओळखले जाते. 

       या शाईचा रंग जांभळा असून डाव्या हाताच्या तर्जनी बोटावर ही शाई लावण्यात येते.हा अर्ध-स्थायी रंग (Semi Permanent dye) आहे जो 15 दिवसांपर्यंत टिकतो. ही शाई रासायनिक पदार्थ + रंग + सिल्वर नाइट्रेट (Silver Nitrate) यांपासून तयार करण्यात आली आहे. हे मिश्रण बोटावर लावल्यानंतर त्याचे रूपांतर Silver Chloride सिल्वर क्लोराइड मध्ये होते की जे पाण्यामध्ये मिसळत नाही तसेच कोणत्याही प्रकारे पुसता देखील येत नाही. या शाईचा सर्व प्रथम वापर 1962 च्या सार्वत्रिक निवडणुकीत केला गेला.

       भारतात नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी (National Physical Laboratory) , न्याय मंत्रालय (Law ministry), चुनाव आयोग, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ( NRDC ) यामध्ये करार करण्यात आला ज्याद्वारे भारत सरकारतर्फे Mysore paints and vatnish Ltd, Mysore या कंपनीला शाई बनविण्याची अधिकृत परवानगी देण्यात आलेली आहे. 1937 मध्ये या कंपनीची स्थापना झाली आहे. जगामध्ये 30 देशांना कंपनीद्वारे मतदान शाईचा पुरवठा केला जातो. भारतात अधिकृतरीत्या सार्वत्रिक निवडणुकीत यांच्याद्वारे शाईचा पुरवठा केला जातो. एका 10 ml बाटलीद्वारे साधारणत 800 मतदारांच्या बोटाला शाई लावण्यात येते.

       2018 मध्ये जेव्हा नोटाबंदी झाली होती त्या सुमारास बँकांमध्ये पाचशे आणि हजार च्या नोटा भरणाऱ्या व्यक्तींच्या बोटाला शाई लावण्यात आली होती जेणेकरून एका वेळेस एकच व्यक्ती पैसे भरू शकेल. नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी द्वारे इन विजीबल शाई (Invisible Ink) चा एक नवीन पर्याय उपलब्ध झाला आहे तसेच यावर संशोधन चालू आहे. यामध्ये बोटाला लावण्यात आलेली शाई फक्त अल्ट्रावायलेट प्रकाशामध्ये दिसेल. प्रकाशामध्ये या शाईचा रंग केशरी दिसतो.

Read More- भारतात हिऱ्यांचा व्यापार कशाप्रकारे केला जातो ?

Read More- Petrol Diesel GST – सुटेल का महागाईचा तिढा ?

5 thoughts on “मतदानाची जांभळी शाई, का करत नाही पुसायची घाई ?”

Leave a Comment