मिलिटरी कोर्ट मध्ये सुनवाई कशी असते ?

Court Martial Information

      Military कोर्टात चालणाऱ्या खटल्यास कोर्ट मार्शल असे म्हणतात तसेच लष्करी अधिकाऱ्यांची चौकशी करणारे न्यायालय या नावाने देखील त्याला ओळखले जाते. कोर्ट मार्शल मध्ये रेप व मर्डर वगळता एकुण 70 अपराधांमध्ये शिक्षा सुनावली जाते तसेच कोर्ट मार्शलमध्ये फाशीपर्यंत शिक्षा सुनावली जाऊ शकते. लष्करी सेवेत असताना नियम मोडणे, युद्धाच्या वेळेस पळून जाणे किंवा आपल्या सैन्य तुकडीला सोडून जाणे, गैर वर्तन करणे, ई. प्रकाच्या गुन्ह्यामध्ये शिक्षा सुनावली जाते.

      1857 पूर्वी कोर्ट मार्शल शिक्षा अस्तिवात नव्हती. त्यानंतर आर्मी कोर्टाची स्थापना झाली व त्याअंतर्गत कोर्ट मार्शल ही प्रक्रिया राबवली जाते. पायदल,नौदल,आणि हवाई दल या तीनही सैन्यदलामध्ये कोर्ट मार्शल चे नियम वेगवेगळे आहेत. स्थळ सेना मध्ये कोर्ट मार्शल सेना अधिनियम 1950 द्वारे शिक्षा करण्यात येते, नौदलात सेना अधिनियम 1950 द्वारे शिक्षा करण्यात येते तसेच हवाईदलात सेना अधिनियम 1957 द्वारे कोर्ट मार्शल ही प्रक्रिया राबविण्यात येते.

▪️ कोर्ट मार्शलचे एकुण चार प्रकार आहेत-

1. General Court martial (GCM)

या कोर्टाच्या अंतर्गत जवान ते अधिकारी पर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात येते. 5-7 सदस्य असणाऱ्या या उच्च अधिकाऱ्यांमार्फत शिक्षा सुनावण्यात येते, तसेच यामध्ये फाशीपर्यंत शिक्षा सूनवण्याचे प्रावधान आहे.

2. District court martial (DCM)

यामधे शिपाई ते GCO पर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना शिक्षा सुनावण्यात येते तसेच जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत शिक्षा सुनावण्यात येते. यामध्ये 2-3 उच्च लष्करी सदस्य असणाऱ्या अधिकारीमार्फत शिक्षा सुनावली जाते. 

3. Summary General Court martial (SGCM)

यामधे जम्मू आणि काश्मीर स्थित तैनात असलेल्या जवानांना शिक्षा सुनावण्यात येते तसेच ही सर्वात जलद गतीने चालणारी प्रक्रिया आहे.

4.Summary Court martial (SCM)

यामधे शिपाई ते NCO पदाधिकाऱ्यांना शिक्षा सुनावली जाते. यामध्ये जास्तीत जास्त 2 वर्षापर्यंत शिक्षा सुनावण्यात येते.

▪️ शिक्षेचे स्वरूप – 

▪️ अपराध सिद्ध झाल्यानंतर फाशीपर्यंत शिक्षा देण्यात येते.

▪️ अपराध गंभीर आहे किंवा सामान्य आहे यानुसार शिक्षेचे प्रावधान आहे.

▪️ अपराध सिद्ध होताच ताबडतोब शिक्षा सुनावली जाते यामध्ये जवानांचे रँकिंग कमी केले जाते किंवा त्यांचे ग्रेड कमी केले जातात.

▪️ उच्च पदावरून कनिष्ठ पदावर नियुक्ती देखील करण्यात येते.

▪️ निवृत्तीनंतर मिळणाऱ्या अनेक लष्करी सुविधा या बंद करण्यात येतात.

▪️ निवृत्तीनंतर मिळणारी पेन्शन देखील बंद करण्यात येते.

     कोर्ट मार्शल चे कामकाज सिव्हिल कोर्टासारखेच असते. कोर्ट मार्शल मध्ये आरोपी आपला वकील देखील निवडू शकतो तसेच त्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देखील दिली जाते.

     कोर्ट ऑफ इन्क्वायरी (Court Of Inquiry), समरी ऑफ एव्हिडन्स(Summary Of Evidence) आणि कोर्ट मार्शल (Court Martial) या तीन प्रक्रियामार्फत आरोपीला शिक्षा करण्यात येते. कोर्ट ऑफ इन्क्वायरी व समरी ऑफ एव्हिडन्स मध्ये आरोप सिद्ध झाला तरीदेखील शिक्षा करण्यात येते व पुढे कोर्ट मार्शलद्वारे देखील शिक्षा करण्यात येते. आरोपी कोर्ट मार्शलमध्ये दिलेल्या शिक्षेविरुद्ध आर्म फोर्स ट्रिबूनल कोर्ट (Armed Force Tribunal Court) मध्ये अपील करू शकतो तसेच तो हाय कोर्टातदेखील अपील करू शकतो.

रेप व मर्डर यासंदर्भातील गुन्ह्यांमध्ये सिव्हिल कोर्टात सुनावणी केली जाते. तसेच लष्करी मार्फत देखील चौकशी करण्यात येते.

Read More- खवले मांजराची अवैध तस्करी तब्बल – 2 लाख प्रति किलो ? Pangolin Animal

Read More- भारतातील National Highway ला नंबर कशा प्रकारे दिले जातात ?

2 thoughts on “मिलिटरी कोर्ट मध्ये सुनवाई कशी असते ?”

Leave a Comment