रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट च्या माध्यमातून काय इशारा दिला जातो ?

       ग्रीन अलर्टजेव्हा सभोवतालची
परिस्थिती सामान्य असेल,कोणताही
अडथळा नसेल तसेच
सगळे सुरळित रित्या
चालू असते अशा
वेळेस ग्रीन अलर्ट
देतात.

    येलो अलर्ट:  आगामी काळात हवामानातील
बदलामुळे एखादे नैसर्गिक संकट
येऊ शकते,दैनंदिन
जीवनात अडथळे निर्माण होऊ
शकतात त्यामुळे नागरिकांना
सावधगिरी बाळगण्याच्या उद्देशाने येलो अलर्ट
देण्यात येतो.

   ऑरेंज अलर्टकोणत्याही क्षणी
नैसर्गिक आपत्ती येऊ शकते,त्यामुळे वीजपुरवठा खंडित
होणे,वाहतूक ठप्प
होण्यासारखे प्रकार घडण्याची शक्यता
वर्तवली जाते, हे या
अलर्ट मध्ये सांगण्यात
येते. संकटांचा सामना
करण्यासाठी नागरिकांनी सतर्क रहावे,महत्वाचे काम असेल
तरच घराबाहेर पडावे
अशा सूचना ऑरेंज
अलर्टमध्ये देतात.

    रेड अलर्टआगामी काळात
नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान
होण्याची शक्यता वर्तवली जाते,नागरिकांनी धोकादायक भागात
जाऊ नये तसेच
सर्व नागरिकांनी स्वतःला
परिवाराला सुरक्षित
ठेवावे, हे रेड
अलर्टमध्ये सांगण्यात येते.

हेही वाचाभारतीय तिरंगा कोठे बनवला जातो?

हेही वाचा-अंतराळात उपग्रह पाठवण्यासाठी PSLV व GSLV यांचा कशाप्रकारे उपयोग केला जातो ?

Leave a Comment