“लक्षद्वीप” एक लाख बेटे.

    केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीप हा 36 बेट मिळून बनलेला प्रदेश आहे. 1 नोव्हेंबर 1956 रोजी लक्षदीप भारतीय संघराज्यात विलीन झाले. लक्षदीप चे एकूण क्षेत्रफळ 32.62 sq km येवढे आहे. लक्षद्वीप या प्रदेशाचा तसा काही जास्त इतिहास नाही,इथे परकीय सत्तांचा अधिवास होता, स्वातंत्र्यपूर्व काळात येथे पोर्तुगीज राज्य करत होते.

    एक लाख बेटे म्हणजेच ‘लक्षद्वीप’ म्हणून हा प्रदेश ओळखला जातो. लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रात स्थित आहेत.एकूण केंद्रशासित प्रदेशांपैकी लक्षद्वीप चा प्रदेश लहान आहे तसेच एकूण बेटांपैकी बित्रा हे सर्वात लहान बेट आहे. पश्चिम किनाऱ्यापासून लक्षद्वीप 400 किलोमीटर अंतरावर आहे. हा प्रदेश केरळ अधिकार क्षेत्रात येतो. 2011 च्या जनगणनेनुसार तेथील एकूण लोकसंख्या 65000 आहे. तसेच येथील साक्षरता दर हा 92 टक्के आहे. या प्रदेशातील प्रमुख भाषा मल्याळम,मही व इंग्रजी आहे. या प्रदेशातील बहुसंख्य लोकसंख्या ही मुस्लीम आहे. कवरत्ती हे शहर लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशाची राजधानी म्हणून ओळखले जाते. लक्षद्वीप पर्यंत जाण्यासाठी हवाई व जलमार्ग हे दोनच मार्ग आहेत.

     शेतीच्या दृष्टीने नारळ पाम हे या प्रदेशातील मुख्य पीक आहे तसेच केळ,वाझा,केलोकेशिया,जंगली बदाम,ब्रेड फळ, ई इतर पिके घेतली जातात. तसेच हा प्रदेश संपूर्ण समुद्राने वेढलेला असल्याने मासेमारी हा येथील प्रमुख व्यवसाय  आहे. विविध प्रकारचे मासे येथे पाहायला मिळतात.

    लक्षद्वीप मध्ये 1971 पासून पर्यटन व्यवसायाला खऱ्या अर्थाने चालना मिळाली.चहू बाजूंनी समुद्र किनारा लाभला असून तेथे स्कुबा डायव्हिंग, विंड सर्फिंग,वॉटर स्किंग,सपोर्ट फिशिंग, ई विविध प्रकारचे खेळ आहेत.तसेच नयनरम्य समुद्र किनारे, वास्तू ,त्यामुळे येथे पर्यटन व्यवसायाला चालना मिळाली.

हेही वाचा – भारतात हिऱ्यांचा व्यापार कशाप्रकारे केला जातो ?

हेही वाचा – भारतीय तिरंगा कोठे बनवला जातो?

1 thought on ““लक्षद्वीप” एक लाख बेटे.”

Leave a Comment