लग्नाआधी सुपारी का फोडली जाते ?

         लग्न-समारंभ असो किंवा धार्मिक विधी विड्याची पाने व सुपारी यांचे या विधीमधील महत्व आपल्या सर्वांना ज्ञात आहे. तसेच जेवण झाल्यानंतर एक पान खाण्याची बऱ्याच भागात प्रथा पडलेली आहे. आजच्या या लेखातून लग्नाच्या आधी सुपारी का फोडली जाते या विधीबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. 

लग्नाआधी सुपारी का फोडली जाते ? धार्मिक विधीमध्ये तिचे.

     तुळशी प्रमाणेच सुपारी सोबत खाल्ले जाणारे विड्याचे पान यालाही धार्मिक विधीमध्ये पवित्र मानले जाते. सुपारी व विड्याचे पान यांची जोडी ही निष्ठा व मजबूत बंधन यांचे प्रतीक मानले जाते. विड्याचे पान हे मुळात दक्षिण – पूर्वी आशिया मधून आलेली वनस्पती आहे. दक्षिण भारतातील एका प्रथेनुसार शुभकार्यासाठी पाहुण्यांना आमंत्रित करताना दोन विड्याची पानं द्यावी लागतात नाहीतर आपल्याला मनापासून आमंत्रित केले गेले नाही असा त्याचा अर्थ होतो. तसेच सुपारी व नाणे यांच्या रूपात पुजाऱ्यांना दक्षिणाही दिली जाते. आसाममध्ये जेवण झाल्यानंतर विड्याची पाने खाण्यासाठी सांगितली जातात ज्यामुळे अन्न पचन सुरळीत होते. बऱ्याचशा आपल्या विधींमध्ये आपण तांब्यातील पाण्यात विड्याचे पाने सोडतो जेणेकरून त्या पाण्याचे शुध्दीकरण होते. 

         रामायणातील एका प्रसंगानुसार, हनुमानजी ज्यावेळेस श्री राम यांचा संदेश घेवून लंकेमधे सितेकडे गेले होते त्यावेळेस हनुमान यांना माघारी जातांना विड्याच्या पानांचा हार सितेद्वारे देण्यात आला जो आनंद व कृतज्ञतेचे प्रतीक मानले जाते आणि याच प्रसंगामुळे हनुमान यांस विड्याचे पाने वाहण्याची प्रथा पडली. सुपारी व विड्याचे पान यांचे नाते अतूट मानले जाते. ते प्रेम, निष्ठा व अखंड बंधन यांस दर्शवते. अगदी त्याचप्रमाणे वर – वधू प्रेम, निष्ठा व अखंड बंधन जोपासून आपल्या नवीन आयुष्याची सुरुवात करतील अशी आशा व्यक्त केली जाते व  लग्नासंबंधी बोलणी करत असताना वर – वधूचे वडील सुपारी – पान चघळत बोलणी करतात, त्यामुळे शांततेत बोलणी होऊन कार्याची पुढील दिशा ठरवली जाते.

         आयुर्वेदानुसार, या पानातील काही विशिष्ट घटक श्वास व पित्तासंबंधी आजार बरे करण्यास उपयुक्त ठरतात. कानासंबंधी आजार व डोकेदुखीची समस्यादेखील पानांच्या मदतीने सोडवली जाते. तसेच व्हिटॅमिन सी, लोह, कॅरोटीन, फायबर, पोटॅशियम, आयोडीन, थिअमिन सारख्या पानातील घटकांमुळे दाताचे आजार, अल्सर, खोकला व अस्थमा देखील बरा होण्यास मदत होते. उत्तर – पूर्वी राज्यांमध्ये ही सुपारी सामाजिक समांतर करण्यासाठी ओळखली जाते. ज्यामध्ये खासी समाजातील लोक आपल्या पाहुण्यांना सुपारी देवून त्यांचे स्वागत करतात. आर्थिदृष्ट्या गरीब असलेली व्यक्ती सुद्धा याला खरेदी करू शकते म्हणूनच याला सामाजिक समांतर करण्याचे प्रतीक मानले जाते. 

        अरेकोलिन हा गंधविरहित तेलकट पदार्थ सुपारीमध्ये आढळतो. या पदार्थांमुळे पोटामधील परजीवी जंतू, आतड्यांमधील घातक जंतू नष्ट करण्यास मदत होते. तसेच सुपारी खाल्याने आपल्या हिरड्या मजबूत होवून दातांचे आरोग्य ठणठणीत राहते. एखाद्या ठिकाणी इजा झाल्यास सुपारी ही गुणकारी मानली जाते कारण तिच्यामध्ये जंतुनाशक गुणधर्म असतात व त्यामुळे लवकर जखम भरण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, पोटदुखीची समस्या असल्यास रिकाम्या पोटी विड्याचे पाने चावून खाल्याने पानांमधील रस पोटातील सामान्य pH पुन्हा सुरळीत करतो. तसेच 1 पान प्रतिदिन खाल्यास शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात व आपली पचनसंस्था निरोगी राहते.

Read More – जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी – LIC ची किंमत 15 लाख करोड रूपये.

Read more – देशाचा वाहतूक खर्च का ठरतोय डोकेदुखी ?

Leave a Comment