व्हेल माश्याच्या उल्टीची किंमत तब्बल 1 कोटी रुपये ? Whale vomit Price.

 whale vomit price per kg in India

       समुद्रकिनारी वसलेल्या मुंबई सारख्या शहरांमधून अवैध विक्रीद्वारे ड्रग्ज, संरक्षित प्राणी यांचा व्यापार छुप्या पद्धतीने होत असल्याच्या बातम्या समाजमाध्यमांमध्ये येत असतात. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या एका बातमीने अचंभित करणारी गोष्ट समोर आणली ज्यामध्ये व्हेल या समुद्रातील माश्याची 1 किलो उलटी तब्बल 1 कोटी रुपयांना विकली जाते असा दावा करण्यात आला. तर आजच्या या लेखातून व्हेल माश्याच्या उलटीला कोटी रुपयांपर्यंतचा भाव का मिळतो याबद्दल माहिती जाणून घेऊया.

व्हेल माश्याच्या उल्टीची किंमत तब्बल 1 कोटी रुपये ? Whale vomit Price.

        इंग्रजी भाषेमध्ये व्हेलच्या उलटीला ‘Ambergris’ म्हटले जाते. ती पातळ स्वरूपात न राहता दगडासारखी दिसते. जगातील एकूण व्हेलच्या संख्येपैकी फक्त 5 टक्के प्रजातीमध्येच हा पदार्थ सापडतो. व्हेल हा मोठा मासा असल्याने स्क्विड आणि कटल या छोट्या माशांना खाऊन तो आपले पोट भरत असतो. यांना खाल्ल्यावर जेव्हा पचन क्रिया सुरू होते त्यावेळेस छोट्या माशांची हाडे, कडक तोंडा जवळचा भाग यांच्या पचनास त्रास होत असल्याने त्यांना जठरामधून बाहेर फेकले जाते ज्याला ‘व्हेल ची उल्टी’ असे म्हणतात. दगडाच्या स्वरूपात असणारी ही उलटी अगदी कमी प्रमाणात लोकांच्या हाती लागते जेव्हा ती समुद्रकिनाऱ्यालगत लाटांच्या मार्फत किंवा मेलेल्या व्हेलच्या सोबत सापडते. 

        तिचा उपयोग अत्तर बनवण्यासाठी तसेच काही देशांमध्ये नशा म्हणून केला जातो. असे म्हटले जाते की ज्यावेळेस काळा आजार हा साथीचा रोग पसरला होता त्यावेळेस काही लोकांनी याला प्लेग पासून वाचण्यासाठी त्वचेवर लावले होते. पूर्वेकडील देशांमध्ये याचा उपयोग औषधोपचार, मसाले यांमध्ये केला जातो तर पाश्चिमात्य देशांमध्ये याचा उपयोग अत्तर बनवण्यासाठी केला जातो. अत्तर बनवण्यासाठी असलेली याची मोठी मागणी याचे कारण असे की, Ambrein नावाचा यामधील पदार्थ अत्तरातील वास जास्त काळापर्यंत टिकून ठेवण्यासाठी सर्वात उपयोगी ठरतो. म्हणजेच जेवढी व्हेल ची उलटी जुनी तेवढी जास्त तिची किंमत आकारली जाते.

          Ambergis ही चीन, जपान, आफ्रिका, अमेरिका यांसारख्या प्रदेशांमध्ये किनाऱ्यालगत बऱ्याचदा सापडलेली आहे. तसेच त्याला बनवणारे व्हेल उष्णकटिबंधीय भागामध्ये जास्त सापडतात. ज्या वेळेस ही माहिती लोकांपर्यंत पोहोचली तेव्हा मोठ्या प्रमाणात व्हेल माशांची कत्तल करण्यात आली ज्यामुळे त्यांची संख्या 11 लाखांवरून 3 लाखांवर आली. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की फक्त 5 टक्के व्हेल मध्येच हे सापडते. यांच्या प्रजाती टिकवण्यासाठी युरोप, ब्रिटन यांनी व्हेल आणि डॉल्फिन यांच्या व्यापारावर कठिण निर्बंध लावले. भारतामध्ये वन्य जीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत त्याच्या व्यापारावर बंदी घातली आहे.

ह्या उल्टीची सध्याची बाजारातील किंमत 1 किलो साठी 1 कोटी एवढी आहे.

Read More- ‘West Indies’ हा देश नसूनही क्रिकेट स्पर्धांमध्ये कशाप्रकारे सहभागी होतो?

Read More- भारताच्या कोणत्या भागात ‘Cancer Train’ चालवली जाते?

5 thoughts on “व्हेल माश्याच्या उल्टीची किंमत तब्बल 1 कोटी रुपये ? Whale vomit Price.”

Leave a Comment