‘शस्त्रसंधीचे उल्लंघन’ म्हणजे काय? युद्धात याचा उपयोग का केला जातो.

            वर्तमानपत्र किंवा सोशल मीडियाद्वारे येणाऱ्या बातम्यांमध्ये आपण भारतपाक सीमेवरील तणावाच्या बातम्या नेहमी ऐकत असतो. जेव्हा आपल्या भारताच्या हद्दीत घुसखोरी करून आपल्या सार्वभौमत्वाला धक्का लावण्याचा प्रयत्न दहशतवादी करतात तेव्हा त्यांना चोख प्रत्युत्तर देवून आपले जवान भारताच्या अभेद्य, चतुर आणि सतर्क सेनेची जाणीव त्यांना करून देत असतात. तेव्हा अशा बातम्यांमध्ये “शस्त्रसंधी” या शब्दाचा उपयोग प्रामुख्याने केलेला आपल्याला आढळतो. तर आपण आजच्या या लेखामध्ये ‘शस्त्रसंधीचे उल्लंघन ‘ म्हणजे काय याबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

             ‘शस्त्रसंधी‘ ज्याला इंग्रजीत Ceasefire असे म्हटले जाते त्याचा उपयोग प्रामुख्याने युद्धाच्या प्रसंगी केला जातो. दोन देशांमध्ये चाललेले युद्ध जर निर्णायक दिशेने(हार किंवा जीत) जात नसेल किंवा युद्धाला विराम लावायचा असेल तर दोन्ही देशांच्या संमतीने अंशतः किंवा पूर्णतःयुद्धविराम” दिला जातो. यामध्ये कोणत्याही प्रकारची आक्रमक हालचाली न करण्याचे आश्वासन दोन्ही देशांद्वारे दिले जाते. तसेच शस्त्रसंधीला पार करून दुसऱ्या देशाच्या भागात जाण्याची परवानगी दिली जात नाही.
       भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1999 मधील कारगिल युद्ध संपल्यानंतर , 2003 साली युद्धबंदी करारावर दोन्ही देशांद्वारे मान्यता देण्यात आली होती. त्यामुळे 2003 ते 2006 यादरम्यान भारत – पाक सीमेदरम्यान घुसखोरी आणि गोळीबार यांना आळा बसला होता. पण 2006 नंतर दहशतवाद्यांनी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यास सुरुवात केली ज्यामुळे देशाचे संरक्षण करतांना आपल्या अनेक शूर जवानांना वीरमरण आले.
           आजच्या या लेखातून आपणास नेहमी चर्चेत असणाऱ्या शब्दाबद्दल सविस्तर माहिती देण्याचा आमचा एक प्रयत्न…
          ह्या लेखाबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा.
                                                     – ऋषिकेश उगले. 
                                                     – सौरभ बिनवडे . 

Leave a Comment