शेळीचे दूध आपल्या आरोग्यासाठी औषधी का मानले जाते?

      मानवजातीच्या
इतिहासात शेळीचे प्राणी म्हणून
सर्वात पहिले संगोपन करण्यात
आले होते. शेळीचं
आपल्या निसर्गामध्ये एक महत्त्वाचे
स्थान आहे. गवतासारख्या
अखाद्यपदार्थाचे खाद्यपदार्थात रूपांतर करण्याचे काम
शेळी या प्राण्याला
निसर्गाने दिलेले आहे. शेळी
आणि मेंढी यांची
चरण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
मेंढी लांब पात्याचे
गवत खाली तोंड
करून खाते तर
शेळी झाडाच्या लोंबकळणाऱ्या
फांद्यांमधून चारा ओरबडून
70 ते 80% भुख ही
झाडाच्या पाल्यावर भागवत असते.
त्यामध्ये ज्या वनस्पतींची
पाने गोल आहेत
(द्विदल वनस्पती) त्यांची पाने
शेळी जास्त प्रमाणात
खाते. हवामान व
उपलब्ध साधन सामग्रीनुसार
हिमालय, वाळवंट, सागर किनारी
प्रदेश अशा विविध
भागात यांच्यामध्ये विविधता
जाणून येते.

     शेळीचे दूध औषधी
मानले जाते – शेळीची
नैसर्गिक क्षमता बघितल्यास आपल्याला
लक्षात येते की,
             

1.  जबड्याची
वैशिष्ट्यपूर्ण रचना

2. निकृष्ट
प्रतीचा चारा पचवण्याची
क्षमता

3. 70 ते
80 टक्के भूख द्विदल
चाऱ्यावर भागवणे

4. झाडपाल्यातील
टॅनिन सारखे पदार्थ
पचवण्याची    क्षमता

5. कोणत्याही
चवीचा चारा खाणे

6. डोंगराळ
व दुर्गम भागात
चरण्याची क्षमता

 त्याचसोबत 36 विविध प्रकारच्या वनस्पती
खाण्याची क्षमता असल्यामुळे त्यांचे
दूध हे औषधी
मानले जाते.
   

       शहरी भागासाठी
शेळी म्हणजे चालत
फिरत कचरा प्रक्रिया
यंत्र आहे. रस्त्याच्या
कडेची झाडेझुडपे, कचरा
कुंडीतील टाकाऊ अन्नपदार्थ व
भाजीपाला, परसबागेतील 
झाडाझुडपांचे
अवशेष यांचे रूपांतर
मांस दुधामध्ये
करते. काही ग्रामीण
भागात शेळ्यांचा उपयोग
झाडू बनवण्यासाठी होतो,
ज्यामध्ये वाळलेल्या नारळाच्या फांद्या
शेळ्यांना खाण्यासाठी दिल्या जातात
बारीक काड्यांचा
भाग सोडून सुकलेला
पानांचा भाग शेळया
खाऊन टाकतात.

        शेळ्यांना राहण्यासाठी गोठ्याची
गरज नसते, ते
कोणत्याही ठिकाणी झाडाखाली किंवा
पत्र्याखाली राहू शकतात
ज्यामुळे त्यांच्या राहण्याच्या सोयीचा
खर्च वाचतो. तसेच
शेळीला चालते फिरते पेरणी
व बियाणे टाकणारे
यंत्र म्हणून संबोधले
जाते
. तिच्या विष्टेद्वारे
सुबाभूळ, बोर यांसारख्या
झाडांच्या बिया जमिनीमध्ये
पसरतात. 1 शेळी वर्षाला
130 किलो खत चराऊ
क्षेत्रात टाखत असते
.
जैविक तणनियंत्रक व
जंगलातील अग्निरोधक म्हणूनही तिला
संबोधले जाते कारण
अमर्यादित क्षमतेने वाढलेल्या गवताला
खुरटून कमी करण्याचे
काम ती करत
असते. बाकी प्राण्यांच्या
तुलनेत शेळी सर्वात
कमी मिथेन उत्सर्जन
करते जे 35 किलो/
वर्ष इतके आहे.
असा सर्वबाजूने विचार
केल्यास आपल्यास समजते की,
शेळी हा निसर्गाचा
मित्र आहे

त्याच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा उचलत
असतो.

Leave a Comment