सिमकार्ड चा एक कोपरा कापलेला का असतो ?

      मोबाईल फोन माणसाच्या आयुष्यातला हा अविभाज्य घटक असून सिम कार्ड हा त्या मोबाईल फोनचा आत्मा आहे. मोबाईल फोन ला वायफाय कनेक्शन असुनही कनेक्टिविटी साठी सिम कार्ड ची गरज असतेच.आजच्या या लेखामधून आपण सिमकार्ड एका बाजूने का कापलेले का असते ? याची माहिती जाणून घेणार आहोत.

सिम कार्ड चा कोपरा का कापलेला असतो ?

      सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल (Subscriber Identity Module) SIM चा फुल फॉर्म आहे.15 मिमी लांब,25 मिमी रुंद आणि 0.76 मिमी जडी अशा प्रकारे सिम कार्डचा आकार असतो.

    पूर्वी ज्या कंपनीचा मोबाईल घ्यायचा असेल त्याच कंपनीचे सिम कार्ड हे मोबाईल मध्ये इन बिल्ट मिळत होते. त्यामुळे ग्राहकांना एखादे सिम कार्ड बदलायचे असेल तर पूर्ण मोबाईल फोन बदलावा लागे. याच गोष्टी लक्षात घेऊन बाजारामध्ये सिम कार्ड आणि मोबाईल फोन हे वेगवेगळ्या स्वरूपात विकले जाऊ लागले. त्यामुळे ग्राहकांना सिम कार्ड बदलणे शक्य झाले परंतु त्या सिम कार्ड चा आकार हा आयताकृती होता म्हणून ते मोबाईल फोन मध्ये टाकताना चुकीच्या पद्धतीने टाकले जायचे, सिम कार्ड ची योग्य बाजू व अयोग्य बाजू यामध्ये ग्राहक गोंधळून जायचे.

    त्यामुळे सिम कार्ड चा आकार बदलण्याचे ठरले, आयताकृती सिम कार्ड चा एक कोपरा कापण्यात आला. यामुळे सिम कार्ड योग्यरीत्या मोबाइल फोन मध्ये बसवता आले तसेच ग्राहकांचा गोंधळ कमी झाला. 

     सिम कार्ड हे एक इंटिग्रेटेड सर्किट (Integrated circuit) आहे. या कार्ड मध्ये इंटरनॅशनल मोबाईल सबस्क्रायबर आयडेंटिटी (International mobile subscriber identity) IMSI सुरक्षितपणे साठवलेले असते. तसेच IMSI आणि  युनिक क्रमांकामुळे डिवाइसवरच्या युजर ची ओळख पटते.

Read More- भारतीय तिरंगा कोठे बनवला जातो?

Read More- Petrol Diesel GST – सुटेल का महागाईचा तिढा ?

Leave a Comment