सॅटेलाईट इंटरनेट म्हणजे काय?

        Satellite Internet Information

     अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत व त्याचबरोबर आता इंटरनेट मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक बनलेले आहे. वस्तुस्थितीत मानव इंटरनेटशिवाय जगू शकत नाही. हेच इंटरनेट आपल्यापर्यंत कसे पोहोचवले जाते याची माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. आपल्या घरांमध्ये जे इंटरनेट येते ते फायबर ऑप्टिक वायरद्वारे येत असते. संपूर्ण जगामध्ये फायबर ऑप्टिक वायरद्वारे इंटरनेट समुद्र तळापासून आपल्यापर्यंत पोहोचवले जाते. तसेच सॅटेलाईट इंटरनेट हे एक अत्याधुनिक इंटरनेट सुविधा पुरवणारे नवीन तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये इंटरनेट सॅटेलाईट द्वारे पुरवले जाते.

सॅटेलाईट इंटरनेट म्हणजे काय?

      सॅटेलाईट इंटरनेट पृथ्वीच्या वातावरणीय भागात स्थिर होऊन पृथ्वीवर इंटरनेट पोहोचवण्यासाठी कार्यक्षम असेल. त्याची उंची सुमारे एक हजार ते पाच हजार किलोमीटरच्या आत राहणार आहे. सॅटेलाईटद्वारे घराच्या छतावर असणाऱ्या रिसिवरच्या माध्यमातून आपल्या घरात इंटरनेट येणार आहे. सॅटेलाईट इंटरनेटचा वापर समुद्रामध्ये मार्गक्रमण करण्यासाठी तसेच विमान प्रवासादरम्यान केला जातो कारण समुद्रामध्ये व हवाई मार्गामध्ये टॉवरच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचवता येत नाही. अतिदुर्गम भागामध्ये जेथे वायरद्वारे इंटरनेट पोहोचू शकत नाही तेथे सॅटेलाईट इंटरनेट ही सुविधा वरदानच ठरणार आहे.

       सॅटेलाईट अवकाशामध्ये प्रक्षेपण करणे, त्याच्या नियोजित ठिकाणी पाठवणे इतर सर्व कार्य हे खूप खर्चिक आहे. सॅटेलाइट इंटरनेट सेवेसाठी सुमारे चार हजार ते आठ हजार सॅटेलाईट उपग्रहांची आवश्यकता आहे त्यामुळे पृथ्वीच्या अवतीभवती सर्व उपग्रहच जागा व्यापतील. सॅटेलाइट इंटरनेट ही सेवा खर्चिक असल्याने त्यामध्ये अजून नाविन्यपूर्ण शोध लागणे गरजेचे आहे जेणेकरून सामान्य लोकांना इंटरनेट सेवा परवडेल.

     30 ते 40 मिली सेकंदांमध्ये वायर इंटरनेट आपल्यापर्यंत पोहोचते परंतु सॅटेलाईट इंटरनेट आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी 600 ते 800 मिली सेकंद पर्यंत वेळ लागू शकतो. उपग्रह उंचीवर स्थिरावले असल्याने एवढा वेळ लागू शकतो. खराब वातावरणामुळे देखील सॅटेलाईट इंटरनेटला बाधा येऊ शकते. वायरद्वारे पुरवठा केले जाणारे इंटरनेट हे स्वस्त तसेच वेगवान आहे.

Read More- कोरोना आणि ऑनलाईन शिक्षण

Read More- व्हेल माश्याच्या उल्टीची किंमत तब्बल 1 कोटी रुपये ? Whale vomit Price.

1 thought on “सॅटेलाईट इंटरनेट म्हणजे काय?”

Leave a Comment