हिंदू धर्मातील साधुसंत भगव्या रंगाचे कपडे का परिधान करतात ?

    भारतामध्ये विविध प्रकारचे सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जातात. कुंभमेळ्यापासून ते विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये साधू- संत भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करतात व आलेल्या उत्सवाचा आनंद लुटतात. तर आजच्या ह्या लेखातून आपण हे जाणून घेणार आहोत की, भगव्या रंगाचे कपडे का परिधान केले जातात.

     आपल्या संस्कृतीमध्ये भगवा हा अग्नीचा रंग मानला जातो. हिंदू धर्मात मृत्यूनंतर माणसाच्या शरीराला अग्निमध्ये अर्पण करून शेवटची प्रक्रिया पूर्ण केली जाते. त्याचप्रमाणे भगवे कपडे परिधान करून साधुसंत हे दाखवण्याचा प्रयत्न करतात की, आम्ही स्वतःच्या इच्छा-आकांक्षा यांचा त्याग करून त्यांना अग्नीमध्ये समर्पित केले आहे व येथून पुढे सर्व आयुष्य मानवजातीच्या उद्धारासाठी समर्पित करत आहोत. या पृथ्वीतलावरील संपत्ती,महागड्या वस्तू, इत्यादींपासून स्वतःला मुक्त ठेवण्याचा व निस्वार्थपणे समाजाची सेवा करण्याचा त्यांचा उद्देश आहे.

         खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या केशरचा रंगही भगवा असतो. ज्याप्रकारे दुधामध्ये केशरला बारीक करून मिसळून घेतल्यास दुधाला एक प्रकारची उत्तम चव आलेली असते त्याचप्रमाणे दुसऱ्यांच्या जीवनात मदत करून त्यांच्या विकासासाठी हे साधुसंत प्रयत्नशील आहेत असा संदेश या वस्राद्वारे दिला जातो.  सूर्य व अग्नी या दोघांचा भगवा रंग असतो व दुसऱ्यांना ऊर्जा देण्याचे काम या दोघांद्वारे केले जाते. तशाच प्रकारचे ऊर्जा देण्याचे काम साधुसंतांद्वारे समाजात पार पाडले जाते असाही या वस्त्राचा अर्थ लागतो. आधीच्या काळी एका आश्रमातून दुसऱ्या आश्रमात जाण्यासाठी ऋषी-मुनी आगीचा दिवा जवळ ठेवायचे पण दूर ठिकाणी जाताना दिव्याच्या सतत विजण्यामुळे त्या रंगाच्या कपड्यांचा वापर सुरू केला गेला असावा असा अंदाज व्यक्त केला जातो.

         आपल्या सूर्यमालेतील सूर्य,मंगळ आणि गुरू यांच्या पृष्ठभागावरील रंग हा भगवा असतो. सूर्याकडून आपल्याला हा संदेश दिला जातो की, ज्ञानाचा उपयोग करून संसारातील मोहन मायेपासून अलिप्त राहून मनाची शांती प्रस्थापित करता येते. मंगळाकडून हा संदेश दिला जातो की, स्वतःच्या इंद्रियांवर संयम मिळवून सत्याच्या मार्गाने मार्गक्रमण केले जाऊ शकते व गुरूकडून आपल्यास हा संदेश दिला जातो की, नकारात्मक ऊर्जेला बाहेर फेकून आपण शरीरातून सकारात्मक ऊर्जा चांगल्या कामांसाठी उपयोगात आणू शकतो.धन्यवाद.

हेही वाचा – भारतात हिऱ्यांचा व्यापार कशाप्रकारे केला जातो ?

हेही वाचा – भारतीय तिरंगा कोठे बनवला जातो?

Leave a Comment