जून महिन्यात पहिल्या पावसाच्या सरी वातावरणात एक नवीन उमेद संचारतात. फुले टवटवीत होऊन जणू मान्सूनच स्वागत करण्यास तयार आहेत असा आभास आपल्याला होतो. यामध्ये एक विशेष गोष्ट जी आपल्या सर्वांना हवीहवीशी वाटते ती म्हणजे पावसाच्या मातीचा सुगंध ! तर आजच्या या लेखातून आपण जाणून घेवूया मातीतील हा वास कसा तयार होतो.
पावसाळ्यात जमिनीमधून येणाऱ्या सुगंधी वासाला इंग्रजी मध्ये ‘ petrichor (पेट्रीकोर)’ असे म्हटले जाते. पावसाळ्यापूर्वी कोरडे हवामान असताना जमिनीतील ॲक्टिनोमायसिट्स (Actinomycetes) बॅक्टेरीया जिओस्मिन (Geosmin) नावाचा पदार्थ बनवतात आणि पावसाची पहिली सर जमिनीवर पडल्यावर हा पदार्थ हवेत मिसळला जातो व नाकाद्वारे आपल्यापर्यंत पोहचतो, ज्याला आपण ‘ पेट्रीकोर ‘ म्हणतो. या वासापासून जे अत्तर 1960 च्या दशकात उत्तर प्रदेशमध्ये विकले जायचे त्याला ‘ मिट्टी का अत्तर ‘ असे म्हटले जात असे. तसेच काही वनस्पतीद्वारे तेलरुपी पदार्थ तयार केला जातो, दगडांच्या कपारीत व मातीमध्ये तो जमा होतो आणि ज्यावेळेस पावसाच्या सरी बरसतात तेव्हा तो हवेत मिसळून सुगंध पसरवतो.
Read more – अवकाशातील कचरा का ठरतोय मानवासाठी डोकेदुखी ?
Read more – भारतामध्ये गॅस सिलिंडरच्या किंमती का वाढत आहे ?
????