5 Star हॉटेलला Rating कशी दिली जाते ?

   5 Star rating of hotels   

     दररोजच्या व्यस्त जीवनातून वेळ काढून कुठे बाहेर जाण्यास आपण नेहमी उत्सुक असतो. नव्या ठिकाणी जाऊन मनाला थोडी शांती भेटावी, परिवारासोबत थोडा वेळ आनंदाने घालवता यावा यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. ह्या सहलीच्या वेळी आरामदायक आणि सुंदर असे 1,2 किंवा 3 स्टार हॉटेल मिळाले तर आपला आनंद द्विगुणित होतो. आजच्या लेखातून हॉटेलला स्टार रेटिंग कशी दिली जाते याबद्दल माहिती जाणून घेवूया.

5 Star हॉटेलला Rating कशी दिली जाते ?

       प्रवाशांना अपेक्षेप्रमाणे राहण्यासाठी सोय व्हावी, हॉटेल संबंधी सरकारी योजनांची अंमलबजावणी करता यावी, हॉटेल व्यवसायाला मंदीच्या काळात योजनांचा लाभ देता यावा ह्या सर्व बाबींना समोर ठेवून हॉटेलला स्टार रेटिंग देण्यात येते. भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे या कामासाठी हॉटेल आणि रेस्टॉरंट मान्यता आणि वर्गीकरण समिती (HRACC) नेमण्यात येते. या समितीचे दोन विभाग आहेत- पहिला विभाग 1 ते 3 स्टार रेटिंग चे काम बघतात तर दुसरा विभाग 4-5 स्टार रेटिंग चे काम बघतात. समितीमध्ये एकूण 8 सदस्य असतात ज्यामध्ये राष्ट्रीय पर्यटन मंत्रालयातील अधिकृत एक व्यक्ती, राज्य पर्यटन मंत्रालयातील अधिकृत एक व्यक्ती, पर्यटन व्यवस्थापक, हॉटेल व्यवसायातला तज्ञ व्यक्ती, फेडरेशन ऑफ हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया मधील सदस्य या सर्वांची मिळून ही समिती असते.

  ▪️ स्टार रेटिंग देतांना खालील मापदंड लक्षात घेतले जातात – 

             1. AC व्यवस्था

             2. पार्किंग आणि सुरक्षा

             3. रूमचा आकार आणि व्यवस्था

             4. दिव्यांग व्यक्तींसाठी व्यवस्था

             5. आग नियंत्रक व्यवस्था 

             6. साफसफाई ई.

सध्याच्या नियमानुसार हॉटेलला रिसेप्शन आणि वेबसाईटवर त्यांच्या स्टार रेटिंगबाबत अचूक माहिती देणे बंधनकारक आहे.

▪️ हॉटेलमध्ये अधिकृतपणे दोन प्रकारे वर्गीकरण असते –

 1. Star Category  

 – 5 star deluxe 

– 5 star 

– 4 star 

– 3 star

– 2 star

– 1 star

2. Heritage Category   

– Grand

– Classic

– Basic

▪️ स्टार रेटिंग कधी कमी केले जाते ?

 ▪️ स्टार रेटिंग समितीच्या म्हणण्यानुसार जर एखाद्या हॉटेलद्वारे नियमांचे उल्लंघन केले तर त्यांना सुधारणा करण्यास संधी दिली जाते आणि सूचनांचे पालन न केल्यास स्टार रेटिंग कमी करण्यात येते. पण अशा गोष्टी खूप कमी वेळेस घडतात, बहुतेक हॉटेल व्यवसायिक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात.

▪️ ड्रगची विक्री, सट्टा लावणे यांसारख्या घटना घडत असल्यास संबंधित हॉटेलवर कठोर कारवाई केली जाते.

▪️ स्टार रेटिंग ही 5 वर्षांसाठी वैध असते. त्यानंतर 5 वे वर्ष संपण्याआधी 3 महिन्यापूर्वी पुन्हा हॉटेल व्यावसायिकाला अर्ज करावा लागतो. ह्या प्रक्रियेसाठी 1 स्टार हॉटेलला- 6,000 रूपये खर्च येतो तर5 स्टार हॉटेलला- 25,000 रुपये खर्च येतो.

▪️ भारतामध्ये अधिकृतपणे जास्तीत जास्त 5 Star Deluxe यापर्यंतच Star rating दिली जाते, जे 6 आणि 7 स्टार अशी जाहिरात करतात ती बऱ्याच वेळेस स्वघोषित रेटिंग असते.

Read More- सिमकार्ड चा एक कोपरा कापलेला का असतो ?

Read More- भारताच्या कोणत्या भागात ‘Cancer Train’ चालवली जाते?

2 thoughts on “5 Star हॉटेलला Rating कशी दिली जाते ?”

Leave a Comment