Ballistic आणि Cruise Missile चा युद्धात कशाप्रकारे वापर केला जातो ?

       चीन या देशाने हायपरसोनिक (आवाजाच्या वेगापेक्षा 5 पट जास्त वेगाने जाणारे) क्षेपणास्त्राची चाचणी केली आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर भीती व्यक्त केली आहे की, Nuclear (अण्वस्त्र) ने सज्ज क्षेपणास्त्र घेवून जाण्याची क्षमता व रडारला चुकवून दुसऱ्या देशावर अचानक हल्ला करण्याची याची सक्षमता यामुळे बाकी देशांनीसुद्धा स्वतःला संरक्षित करण्यावर भर द्यायला हवा. तर आजच्या ह्या लेखामध्ये Cruise आणि Ballistic क्षेपणास्त्राबद्दलची माहिती आपण जाणून घेवूया.

Ballistic आणि Cruise Missile चा युद्धात कशाप्रकारे वापर केला जातो ?


 ▪️ Ballistic missile-

हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र म्हणून ओळखले जाते. ह्या क्षेपणास्त्रामध्ये रॉकेट इंजिनचा वापर केलेला असतो. या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण हे जमिनीवरून केले जाते व प्रक्षेपण केल्यानंतर हे क्षेपणास्त्र आपल्या लक्ष्याकडे मार्गक्रमण करते. उदा.. एखादा चेंडू हाताने फेकून दिल्यावर तो ठराविक अंतर वरती जाऊन मग जमिनीच्या दिशेने झेपावतो त्याचप्रमाणे Ballistic क्षेपणास्त्र लक्ष्यभेदण्यासाठी मार्गक्रमण करते. तसेच ते वर गेल्यावर आपल्या नियंत्रणात राहत नाही व एखाद्या ठराविक भागात जाऊन पडते. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रधारी असल्यामुळे पडणाऱ्या भागात मोठा आघात घडवून आणते. त्याची मारक क्षमता आणि एकूण प्रक्रिया बघितल्यावर क्षत्रूच्या मनात धडकी भरते व त्यामुळे युद्धावेळी वर्चस्वही गाजवता येते.

▪️ Ballistic missile चे काही प्रकार खालीलप्रमाणे-

लहान पल्ल्याचे क्षेपणास्त्र – 300 KM

मध्यम पल्ल्याचे क्षेपणास्त्र -1000-3500 KM

लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र -3500-5500 KM

आंतरखंडीय क्षेपणास्त्र – 5500 KM पेक्षा अधिक.

विविध स्फोटके वाहून नेण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात तयार केलेली असते. हे क्षेपणास्त्र अधिक उंची गाठत असल्याकारणाने हे शत्रूच्या रडारमध्ये दिसू शकते.

भारतातील महत्वाची Ballistic क्षेपणास्त्रे- पृथ्वी,धनुष, अग्नी, शौर्य , सूर्या ई. प्रमुख क्षेपणास्त्रांची नावे आहेत.

  ▪️ Cruise (क्रुझ) क्षेपणास्त्र – 

  जगातील घातक क्षेपणास्त्रामध्ये याचा प्रमुख उल्लेख केला जातो. हे मिसाईल अत्यंत घातक असल्याने त्याची अनेक शत्रू भीती बाळगून आहेत. या क्षेपणास्त्रामध्ये जेट इंजिनचा वापर केला जातो. तसेच या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण हे जमिनीवरून, हवेतून व समुद्रातून केले जाऊ शकतो. जमिनीवरून-जमिनीवर,जमिनीवरून-हवेत व हवेतून-हवेत या क्षेपणास्त्राचा मारा केला जाऊ शकतो. भारताच्या तिन्ही सैन्यदलामध्ये या क्षेपणास्त्राचा वापर प्रामुख्याने केला जातो. हे क्षेपणास्त्र लक्षाचा अचूक भेद करून नष्ट करू शकते व याची अचूकता Ballistic missile पेक्षा अधिक असते. हे क्षेपणास्त्र जमिनीजवळील थोड्या उंचीवरून प्रवास करत आपल्या लक्ष्याकडे जाते त्यामुळे कोणत्याही शत्रूच्या रडार यंत्रणेमधून हे क्षेपणास्त्र छुप्या पद्धतीने निसटून जाऊ शकते.

▪️ Cruise missile चे विविध प्रकार खालीलप्रमाणे –

Subsonic – Mach 0.8 ( आवाजाच्या पेक्षा कमी वेग)

Supersonic – Mach 2-3 ( आवाजापेक्षा 2-3 पट)

Hypersonic – Mach 5 ( आवाजापेक्षा 5 पट वेग )

*Mach- आवाजाच्या वेगाला ‘Mach’ समजले जाते.

Cruise Missile हे आवाजाच्या वेगापेक्षा जास्त वेगामध्ये प्रवास करतात.

उदा..निर्भय 1000 Km, ब्रम्होस 300 Km

  ▪️ Integrated guided missile development programme.

(एकात्मिक मार्गदर्शक क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम) 

   डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांनी या क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम योजनांमध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. हया क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमामुळे भारत क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात आत्मनिर्भर झालेला आहे. या कार्यक्रमाद्वारे विकास केलेल्या क्षेपणास्त्रांची अचूकता ही इतकी प्रबळ आहे की त्याच्या लक्षाने कितीही हालचाल केली तरीही ही क्षेपणास्त्रे त्याचा अचूक भेद करून नष्ट करतात. क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात आज भारत जगातील अव्वल स्थानावर आहेत.

या कार्यक्रमाअंतर्गत बनवलेले क्षेपणास्त्र खालील प्रमाणे –

Prithvi– जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे.

Akash-  जमिनीवरून अवकाशात मारा करणारे.

Nag– Anti Tank missile

Trishul-जमिनीवरून अवकाशात मारा करणारे तसेच अवकाशातून अवकाशात मारा करणारे.

Agni– जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र..

Read More- पद्मश्री व भारत रत्न पुरस्कार माहिती.

Read More- अंतराळात उपग्रह पाठवण्यासाठी PSLV व GSLV यांचा कशाप्रकारे उपयोग केला जातो ?

9 thoughts on “Ballistic आणि Cruise Missile चा युद्धात कशाप्रकारे वापर केला जातो ?”

Leave a Comment