Mobile Number हा 10 अंकीच का असतो ?

        पूर्वीच्या काळी संदेश देवाणघेवाणीसाठी कबूतरे वापरली जायची आणि त्यानंतर जसा काळाने वेग पकडला टेलिफोन पासून ते मोबाईल पर्यंत नवनवीन साधनांच्या माध्यमातून संदेश देवाणघेवाण अलीकडच्या काळात फक्त काही सेकंदातच उपलब्ध झाली ही मानवाची खरंच मोठी प्रगती मानली जाते. दररोज वापरत येणाऱ्या मोबाईल आणि टेलिफोन यांचा नंबर हा 10 अंकीच का असतो याबद्दल आज आपण जाणून घेऊया.

     भारतामध्ये 10 अंकी मोबाईल नंबर ठेवण्याचा निर्णय लोकसंख्येच्या आधारावर घेण्यात आला होता. याकरिता National Numbering Plan,2003 अंतर्गत 10 अंकी नंबरसंबंधी नियम ठरवण्यात आले. या 10 अंकी संख्येमुळे आपल्याला 1000 करोड मोबाईल नंबर उपलब्ध होतात. या नंबरमधून खालील प्रकारे माहिती घेतली जाऊ शकते- 

     *  Mobile No– (98-XYZ-12345)

1. पहिले दोन अंक Access Code( उदा.98,78,84)

2. त्यानंतरचे तीन अंकNetwork operator code  

                                              (उदा. XYZ)

3. शेवटचे पाच अंकSubscriber number

                            (ग्राहक क्रमांक- उदा. 12345)

       

     ज्याप्रमाणे मोबाईल नंबर दहा अंकी असतात त्याचप्रमाणे टेलीफोन नंबर हेदेखील दहा अंकिच असतात. टेलीफोन नंबरला दोन भागात विभागून आपण त्यामधील माहिती जाणून घेऊ शकतो- 

   *Telephone no– (011-12345678)

यामध्ये ‘0’ हा टेलिफोन मधून मोबाईलवर कॉल करण्यासाठी वापरला जातो.

1. Area code– ‘0’ वगळून पहिले दोन ते चार अंक आपल्याला भारतामधील क्षेत्राची माहिती देतात. (उदा.11-दिल्ली)

2. Subscriber number– हा ग्राहकाला दिलेला नंबर असतो जो Area Code नुसार 6 ते 8 अंकी असतो 

(उदा. 12345678).

म्हणजेच,

•  दोन अंकी Area Code (मोठ्या शहरात) असल्यास आठ अंकी Subscriber number

तीन अंकी Area Code (निम-शहरी भागात) असल्यास सात अंकी Subscriber number

चार अंकी Area Code (तालुका,ग्रामीण भागात) असल्यास सहा अंकी Subscriber number.

     आपल्याकडील मोबाईल नंबर 9,8,7आणि 6 या अंकांनी सुरू होतो पण 0,1,2,3,4,5 या अंकांनी का सुरुवात होत नाही ते आपण समजून घेऊ.

•  ‘0’ हा अंक टेलीफोन नंबर मध्ये सर्वात पहिले वापरण्यात येत असल्याने तो घेतला जात नाही.

  ‘1’ एक हा अंक अत्यावश्यक सेवा जसे 100,101, 108 यामध्ये वापरात असल्यामुळे घेतला जात नाही.

2,3,4,5 ह्या अंकांनी टेलिफोन नंबर सुरू होत असल्याने त्यांचा वापर येथे करण्यात येत नाही.

अशाप्रकारे आपण आजच्या लेखातून मोबाईल व टेलीफोन नंबर दहा अंकी का असतो याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली. पुढच्या लेखात अशाच प्रकारची नवीन माहिती आम्ही घेऊन येत आहोत तोपर्यंत धन्यवाद.

                                                     -ऋषिकेश उगले.
                                                     -सौरभ बिनवडे.

Leave a Comment