‘West Indies’ हा देश नसूनही क्रिकेट स्पर्धांमध्ये कशाप्रकारे सहभागी होतो?

      ब्रिटिश राष्ट्रात सुरू झालेल्या क्रिकेट ह्या खेळाने अनेक क्रिकेटप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवलेले आहे तसेच बहुतांश सक्षम खेळाडूंच्या जीवनाला नवीन दिशा देण्यामध्येही मोलाचा वाटा उचललेला आहे. देश विदेशातील संघ आपापल्या देशाचे प्रतिनिधित्व करून जगाच्या पटलावर देशाचा ठसा उमटवण्यासाठी नेहमी मेहनत घेत असतात. तर आजच्या ह्या लेखामधून आपण West Indies संघाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत की,ह्या नावाचा देश नसतांनाही कशाप्रकारे हा संघ विविध क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतो.

       वेस्ट इंडीज हा संघ केवळ एका देशाचे प्रतिनिधित्व न करता तो संपूर्ण कॅरिबियन समुद्रात असणारे बेटे ,प्रदेश यांचे प्रतिनिधित्व करतो. उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका या दोन खंडांच्यामध्ये कॅरेबिन समुद्र (उत्तर अटलांटिक महासागर) आहे. त्या संपूर्ण कॅरिबियन समुद्रात छोटे- छोटे प्रदेश,बेटे व द्वीप समूह आहेत आणि या सर्व प्रदेश व बेटे यांमधील सर्व खेळाडू मिळून त्यातूनच वेस्ट इंडीज संघ तयार झाला. हा संघ वेस्ट इंडिज क्रिकेट बॉर्डाच्या अंतर्गत येतो व त्याची स्थापना 1920 साली झाली व तो 1926 साली ICC मध्ये रजिस्टर करण्यात आला. तसेच त्यांचा पहिला सामना हा 1928 मध्ये इंग्लंड विरुद्ध आयोजित करण्यात आला होता.
        कॅरिबियन समुद्रात असणारे सर्व प्रदेश व बेटे हे स्वतंत्र देश आणि प्रदेश म्हणून गणले जातात.13 स्वतंत्र द्वीप देश आणि 18 अवलंबित द्वीप यांमधून वेस्ट इंडिज संघ तयार होतो. तेथे पूर्वी इंग्रजाचे वर्चस्व असल्यामळे क्रिकेट हा खेळ खूप प्रसिद्ध झाला. त्यामुळे तेथील बऱ्यापैकी सर्वांना क्रिकेट हा खेळ आवडतो. येथील प्रसिद्ध खेळाडू जसे ‘Chris Gayle‘ -(जमैका), ‘Dwayne Bravo आणि Pollard (त्रिनिनाद) यांनी क्रिकेटच्या विश्वात एक नवीन ओळख निर्माण केलेली आहे. क्युबा हा देश कॅरेबियन बेटांवरील सर्वात मोठा देश आहे व  आकारमानाने आपल्या केरळ राज्यासोबत आपण त्याची तुलना करू शकतो. वेस्ट इंडीज संघातील खेळाडू विविध देशांमधील असल्याकारणाने या संघाला त्याचे स्वतंत्र राष्ट्रगीत नाही तसेच हे खेळाडू “क्रिकेट अंथेम” गातात व त्यांचा ध्वज हा कॅरिबियन बेटांवरील विविधता दर्शवतो.
                                                        -ऋषिकेश उगले. 
                                                        -सौरभ बिनवडे. 

Leave a Comment