कृषिदूतांनी केले ‘ जागतिक मृदा दिनाचे ‘ आयोजन

       कृषि महाविद्यालय, पुणे – “ग्रामीण कृषि जागरूकता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम” अंतर्गत हवेली तालुक्यातील मौजे शिवापुर येथे जागतिक मृदा दिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये माती- पाणी परीक्षणाचे महत्व, मृदा आरोग्य, सेंद्रिय व शाश्वत शेती, जमिनीची धूप कमी करण्यासाठीच्या उपाय-योजना या विषयांवर तज्ञ शास्त्रज्ञांचे मार्गदर्शनपर व्याख्याने तसेच पिके व फळबाग लागवडीकरिता माती परीक्षणासाठी नमुना घ्यावयाचे प्रात्यक्षिक घेण्यात आले.

कृषिदूतांनी केले ' जागतिक मृदा दिनाचे ' आयोजन

     याप्रसंगी कृषि महाविद्यालयातील मृद विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. अनिल बुलबुले, सहयोगी प्राध्यापक डॉ. अविनाश गोसावी, सहाय्यक प्राध्यापक डॉ. अभय पाटील व रावे कार्यक्रमाचे केंद्रप्रमुख डॉ. मृणाल अजोतीकर व कार्यक्रम अधिकारी डॉ. आनंद जाधव या तज्ञांचे माती विषयक मार्गदर्शन शेतकऱ्यांना लाभले. यादरम्यान शेतकऱ्यांच्या कृषिविषयक शंकांचे निरसन चर्चात्मक पद्धतीने करण्यात आले. कृषि महाविद्यालय, पुणे येथील कृषि अवशेष व्यवस्थापन शिक्षण कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी निर्मित केलेले गांडूळ खत व व्हर्मीवॉश या सेंद्रिय निविष्ठांचे प्रतिनिधीक स्वरूपात वितरण करण्यात आले. 

      या कार्यक्रमाला मौजे शिवापूरचे सरपंच श्री.सतीश दिघे, ग्रामसेवक श्री.मारुती घोळवे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमास कृषि सहाय्यक सौ.साळुंखे व कृषी विभागाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Read More –  पाऊस पडल्यावर मातीचा सुगंधी वास का येतो ?

Read More – भारतामधे सोन्याच्या खाणी कोठे आढळतात ?

Leave a Comment