जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी – LIC ची किंमत 15 लाख करोड रूपये.

       ‘ जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी ‘ या ओळीच्या माध्यमातून देशातील घराघरात जागा करणारी व आपल्या आर्थिक नियोजनामध्ये खारीचा वाटा उचलणारी LIC आपल्या सर्वांना माहीतच आहे. या LIC कंपनीचा जनतेमध्ये प्रभाव एवढा आहे की एखादी भविष्यासाठी पॉलिसी काढायची असल्यास आपण पॉलिसी नाही तर LIC काढा असे म्हणतो. आजच्या लेखातून LIC ह्या कंपनीची एकूण संपत्ती, विदेशातील कंपनीच्या शाखांचे विस्तृत जाळे यासंबंधात माहिती जाणून घेवूया.

जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी - LIC ची किंमत 15 लाख करोड रूपये.

       1956 पर्यंत भारतामध्ये 245 विविध खाजगी विमा कंपन्या अस्तित्वात होत्या व त्यांना 1 सप्टेंबर 1956 रोजी केंद्र सरकारद्वारे एकत्र करून LIC ही सरकारी विमा कंपनी स्थापित करण्यात आली. LIC ही कंपनी भारतातील 91% जिल्ह्यांमध्ये विस्तारलेली आहे. 1956 पासून ते 2000 सालापर्यंत LIC ही भारतातील एकमेव जीवन विमा कंपनी होती त्यामुळे तिचा या क्षेत्रातील वाटा 100% होता पण 2000 सालानंतर खाजगी कंपन्यांच्या विस्तारामुळे 2021 पर्यंत 64% वर येवून पोहचला आहे. लंडन स्थित Brand Finance रिपोर्टनुसार, LIC हा जगातील विमा क्षेत्रात तिसरा सर्वात मजबूत Brand मानला जातो.

      30 सप्टेंबर 2021 पर्यंत LIC चा AUM (Asset Under Management) 39.74 लाख करोड आहे म्हणजे तिच्या व्यवस्थापनाखाली 39.74 लाख करोड रुपयांची गुंतवणूक केली जाते. कंपनी एकूण 2048 शाखा, 113 विभागीय कार्यालये आणि 1554 उपग्रह कार्यालयाद्वारे कार्य करते. विदेशातील प्रमुख देश जसे की, फिजी, मॉरीशस, बहरैन, कतर, कुवैत, ओमान, यूएई, बांगलादेश, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका आणि युनायटेड किंगडम या देशांमध्ये LIC चे जाळे विस्तृत पसरलेले आहे.

          LIC कंपनीकडे एकूण 13.5 लाख एजंट आहे. तसेच देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदार म्हणूनही या कंपनीला ओळखले जाते. LIC च्या एकूण गुंतवणुकीपैकी 37% गुंतवणूक केंद्र सरकारमधील सेक्युरीटिझ, 24% गुंतवणूक राज्य सरकारमधील सेक्युरीटिझ , 8% टक्के गुंतवणूक कॉर्पोरेट बाँड आणि 24% गुंतवणूक इक्विटी सेक्युरीटीमध्ये करण्यात येते. पॉलिसीधारकांनी आतापर्यंत दावा न केलेली रक्कम जी LIC कडे अतिरिक्त शिल्लक आहे ती तब्बल 21,000 करोड इतकी आहे. केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार LIC मधील सरकारचा 5% हिस्सा विकला जाणार आहे ज्यामध्ये पोलिसीधारकांना सवलतीमध्ये शेअर्स वाटले जाणार आहे, त्याकरिता पॉलिसीधारकांकडे डिमॅट अकाउंट असणे गरजेचे आहे.

Read More- भारतातील National Highway ला नंबर कशा प्रकारे दिले जातात ?

Read More- भारतीय रुपयाचे जागतिक चलनांशी संबंध

2 thoughts on “जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी – LIC ची किंमत 15 लाख करोड रूपये.”

Leave a Comment