भारतात बंदूक कोठे बनवली जाते व त्याचा परवाना कसा मिळतो ?

       सिद्धू मूसेवाला या गायकाने संगीत व मनोरंजन क्षेत्रात जे भरगच्च योगदान दिले आहे त्याची आपल्या सर्वांना ओळख आहेच. नुकतीच त्याची पंजाबमध्ये गोळ्या झाडून झालेली हत्या व त्यानंतर भारतातील बंदूक बाळग्ण्यासंबंधी असलेली कायदा – व्यवस्था यावर चर्चांना उधाण आले. तर आजच्या या लेखातून बंदूक कोठे बनवली जाते व त्यासंबंधी परवाना कसा मिळतो याबाबत आपण जाणून घेवूया.

भारतात बंदूक कोठे बनवली जाते व त्याचा परवाना कसा मिळतो ?

      सरकारी आकडेवारीनुसार पंजाब राज्यामध्ये भारताची 2 टक्के जनसंख्या राहते व देशातील 10 टक्के बंदूक परवाना पंजाबमध्ये दिला जातो यावरून आपल्या समजते की बंदुक घेण्यासाठी येथे किती मागणी आहे. 2018 च्या आकडेवारीनुसार पंजाब , जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेश नंतर तिसरे सर्वात जास्त बंदूक परवाना काढण्यात अग्रेसर राज्य आहे. या राज्यात परवाना घेण्यासाठी हलका नावाची व्यवस्था अस्तित्वात आहे ज्यामध्ये स्थानिक आमदारांच्या निदर्शनाखाली स्थानिक पोलीस चौकी परवाना देते. येथील युवकांवर स्थानिक पंजाबी गाण्यांचा वापर करून बंदूक असणे ही प्रतिष्ठेची गोष्ट आहे अशी बाब त्यांच्या मनावर बिंबवण्यात आली. 

      सध्या पंजाबमध्ये 4 लाख सक्रिय बंदूक परवानाधारक आहेत. एका परवान्यावर जास्तीत जास्त 2 बंदुक घेतल्या जाऊ शकतात. यात महत्त्वाची बाब म्हणजे नागरिकांकडे असणाऱ्या एकूण बंदुकांची संख्या ही पोलीस यंत्रणेकडे असलेल्या संख्येपेक्षा जास्त आहे. यामध्ये बऱ्याचशा बंदुक अवैध मार्गाने मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश राज्यातून येत असतात. 2016 च्या आकडेवारीनुसार, आपला भारत बंदुकीद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये 3 ऱ्या क्रमांकावर येतो. 1959 साली, शस्त्र कायदा पारित करण्यात आला ज्याद्वारे भारतातील बंदूक परवाना नियंत्रित करण्यात येतो. त्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षाचा कारावास व अतिरिक्त दंड ठोठावला जाऊ शकतो. 

       या कायद्याअंतर्गत नेमबाजीच्या खेळाडूंना 12 शस्त्र ठेवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. तसेच हा परवाना 5 वर्ष अधिकृत असतो व त्यानंतर पुन्हा नूतनीकरण करावे लागते.

खालील व्यक्तींना बंदूक परवाना देण्यास सक्त मनाई आहे –

1. 21 वर्षाखालील व्यक्ती

2. जी व्यक्ती गंभीर हिंसक गुन्ह्यांमध्ये सहभागी होते

3. मनाचे संतुलन बिघडलेले व्यक्ती

4. विस्कळीत क्षेत्रातील व्यक्ती 

  – भारतामधील ‘ मुंगेर ‘ जे पटनापासून 210 किमी आहे जे बंदूक बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे शासन अधिकृत बंदूक बनवली जाते. 2016 च्या आकडेवाडीनुसार भारतामध्ये एकूण 97 बंदुक बनविण्याचे कारखाने सक्रिय आहेत जे बिहार, युपी, आसाम, कर्नाटक, हिमाचल प्रदेश ई. ठिकाणी पसरलेले आहेत. 

जपान व यूके सारख्या देशांनी कडक नियम बनवल्यामुळे त्यांच्या देशातील गुन्ह्यांचे प्रमाण व हत्येचे प्रमाण कमी आहे. भविष्यात आपल्या देशातही याविषयावर विचार केला जाऊ शकतो.

Read More- अवकाशातील कचरा का ठरतोय मानवासाठी डोकेदुखी ?

Read More- संसदीय अधिवेशन केव्हा आयोजित केले जाते व त्याचा कालावधी किती असतो?

Leave a Comment