सिंगापूरमध्ये फॅक्टरीत बनवले जातात डास !

      डास’ हा शब्द काढला की आपल्या मनात त्याला कधी सापडतो व मारून टाकतो ही भावना बनलेली आहे. आपल्या कानाजवळ येऊन गुन-गुन करणे, शरीरावर चावणे या सर्व गोष्टी अनुभवल्यावर आपल्या मनात एक विचार येतो की जर या पृथ्वीवरून डासांची पूर्ण पैदास संपवून टाकली तर किती चांगले होईल. आजच्या या लेखांमधून आपला हा दृष्टिकोन योग्य आहे की अयोग्य याबद्दल जाणून घेऊया.

       डासांमधील नर हे जीवनावश्यक अन्नाची गरज झाडांवर मिळणाऱ्या साखरेपासून पूर्ण करतात. या उलट मादी डास मानवी रक्ताचा वापर करून अंडे देण्याची प्रक्रिया पूर्ण करते. नर डासांद्वारे वनस्पतीमधून अन्न जमा करताना परागन (वनस्पतीमध्ये गर्भधारणा) प्रक्रिया होते, ज्यामुळे एक नवीन जीव या सृष्टीमध्ये जन्मास येतो. बहुतांश वेळा डासांद्वारे केले जाणारे परागन आपल्या निदर्शनास येत नाही कारण की सायंकाळी अंधार पडण्यापूर्वी हे नर डास वनस्पतींवर बसतात व जर माणसांचा जवळपास वावर असेल तर ते प्रभावीपणे कार्य करू शकत नाही. 

       सिंगापूर या देशाने डासांमुळे होणाऱ्या रोगांवर नियंत्रण आणण्यासाठी एक भन्नाट कल्पना अवलंबून बघितली आहे. त्यांनी डासांमध्ये ‘ वोलबाचीया ‘ नावाचा बॅक्टेरियाचा संसर्ग केला ज्यामुळे डासांमध्ये प्रजनन प्रक्रिया थांबवली गेली. असे संसर्ग झालेले सर्व डास त्यांनी फॅक्टरीमध्ये बनवण्यास सुरुवात केली. 50 लाख डास प्रति आठवडा या वेगाने त्यांनी देशातील विविध भागात संसर्ग झालेले डास सोडले. या डासांनी डेंगू, मलेरियासाठी कारणीभूत ठरणाऱ्या डासांसोबत प्रजनन केले त्यावेळेस रोगांना कारणीभूत ठरणारी मादी अंडे बनवण्यात अयशस्वी झाली. यामुळे त्या भागातील मलेरिया, डेंगू यांसारखे डासांमुळे होणारे आजार कमी करण्यासाठी खूप मदत झाली. 

      जगामध्ये 3500 डासांच्या प्रजाती आढळतात ज्या मधल्या ठराविक प्रजातीच माणसांना चावतात. एक डास स्वतःच्या वजनापेक्षा जास्तीत जास्त 3 पट रक्त शोषून घेवू शकतो. रात्रीच्या वेळेस हेच डास जास्त सक्रिय असतात कारण दिवसा उन्हामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी होऊन मरण्याची शक्यता जास्त असते. सामान्यता डास 2 ते 3 आठवडे जिवंत राहू शकतात. आर्क्टिक प्रदेशातील वनस्पती डासांच्या घोळाक्यांना आकर्षित करून परागन प्रक्रिया पूर्ण करतात. आनुवंशिक पुराव्यांद्वारे आपल्याला हे लक्षात येईल की ज्याप्रमाणे फुलांचे वेगवेगळे रंग तयार होत गेले त्याचप्रमाणे विविध डासांच्या प्रजाती जन्मास आल्या. 

        डासांच्या अळ्या झाडांचे पाने कुजवणाऱ्या सूक्ष्म- जिवाणूंना खाऊन स्वतःचे भरण पोषण करतात. त्याच अळ्या नंतर मासे, कीटक, पक्षी यांचे अन्न बनतात. वनस्पतींवर अवलंबून असणारे काही कीटक एक गोड चिकट पदार्थ सोडतात जो डासांद्वारे खाल्ला जातो. हा पदार्थ सापडणे सोपे नाही पण डासांच्या प्रजातींनी यावर एक शक्कल लढवली ज्याद्वारे ते या पदार्थात आढळणाऱ्या सूक्ष्मजीवांच्या वासाने त्याचे ठिकाण शोधून काढतात. हा पदार्थ मुंग्याही आवडीने खातात व जेव्हा डासांना हा पदार्थ विनामेहनत खायचा असेल तेव्हा ते मुंग्यापाशी जाऊन त्यांच्या तोंडातून सोंड टाकतात व त्यांच्या अंटेंनाद्वारे मुंगीला दर्शवतात की मलाही तो पदार्थ पाहिजे तेव्हा मुंगी उलटी करून तो पदार्थ थोड्या प्रमाणात डासांना देते. अश्याप्रकारे डास हे आपल्या निसर्गातील बऱ्याचशा गोष्टींमध्ये मोलाचा वाटा उचलतात पण आपण मानव फक्त त्यांना चावण्याच्या दृष्टिकोनतून बघतो व निसर्गाच्या बनवलेल्या या जीवसृष्टीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला बघतो.

Read More – पाऊस पडल्यावर मातीचा सुगंधी वास का येतो ?

Read More – ‘चेक बाऊन्स’ झाल्यावर होणार कारावासाची शिक्षा !!!

2 thoughts on “सिंगापूरमध्ये फॅक्टरीत बनवले जातात डास !”

Leave a Comment